पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्र-मैत्रिणींना घरात ठेवणे क्रूरताच -उच्च न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 16:11 IST2024-12-24T16:09:35+5:302024-12-24T16:11:32+5:30

Calcutta high court order: पतीचा आक्षेप असतानाही मित्रांना आणि माहेरच्या लोकांना घरात ठेवण्याच्या आधारावर उच्च न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला. 

Keeping relatives and friends in the house without the husband's consent is cruelty - High Court | पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्र-मैत्रिणींना घरात ठेवणे क्रूरताच -उच्च न्यायालय

पतीच्या संमतीशिवाय माहेरचे लोक आणि मित्र-मैत्रिणींना घरात ठेवणे क्रूरताच -उच्च न्यायालय

पत्नी आपल्या इच्छेविरोधात जाऊन घरी तिच्या मित्र परिवाराला आणि माहेरच्यांना घरी राहायला बोलवते. इतकंच नाही, आम्ही दोघेही घरी नसतो, तेव्हाही ते आमच्या घरीच राहतात, अशी फिर्याद घेऊन न्यायालयात पोहोचलेल्या पतीच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला. पतीच्या इच्छेविरुद्ध असे करणे म्हणजे एक प्रकारची क्रूरताच आहे, असे न्यायालयाने घटस्फोट मंजूर करताना म्हटले. 

न्यायमूर्ती सब्यासाची भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती उदय कुमार यांच्या खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. 

घटस्फोटाचं प्रकरण उच्च न्यायालयात, कारण काय?

कोलकाता उच्च न्यायालयात घटस्फोटाचे प्रकरण आले. दोघाचे लग्न १५ डिसेंबर २००५ मध्ये झाले होते. पत्नी जास्तीत जास्त वेळ आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत राहत होती. २५ डिसेंबर २००८ रोजी पतीने न्यायालयात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली होती. त्याच वर्षी २७ ऑक्टोबर रोजी पत्नीने पती आणि त्याच्या कुटुंबीयांविरोधात पोलिसांत तक्रार दिली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. 

न्यायालयाने निकाल देताना काय म्हटले?

न्यायमूर्ती भट्टाचार्य आणि न्यायमूर्ती कुमार यांच्या खंठपीठाने निकाल देताना म्हटले की, पत्नीकडून पतीसोबत असह्य व्यवहार होत असल्याचे पुरेसे पुरावे आहेत. त्यामुळे घटस्फोट देणेच योग्य आहे. 

पतीच्या शासकीय निवासस्थानी त्याचा आक्षेप असताना महिलेने तिच्या मित्रमैत्रिणींना आणि माहेरच्या लोकांना घरात ठेवले. हे रेकॉर्डवरून सिद्ध होत आहे. कधी कधी पती-पत्नी घरी नसतानाही हे ललोक राहत होते, हे क्रूरतेच्याच कक्षेत येते, असे न्यायालयाने म्हटले. 

पत्नी खूप आधीपासून पतीसोबत वैवाहिक आयुष्य जगण्यास नकार देत आहे. दोघांमध्ये बऱ्याच वर्षांपासून दुरावा निर्माण झाला असून, त्यात सुधारणा होण्याची शक्यता नाही. २००५ ते २००८ पर्यंत पत्नी कोणतीही तक्रार न करता राहिली. लग्न झाल्यानंतर पत्नी तिच्या आईसोबत आणि मैत्रिणीसोबत राहत होती. यातून सिद्ध होतं की, पतीवर केलेले आरोप आधारहीन आहेत, असेही न्यायालयाने म्हटले.

Web Title: Keeping relatives and friends in the house without the husband's consent is cruelty - High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.