सुधारणा प्रक्रियेला राजकीय दबावापासून दूर ठेवा
By Admin | Updated: November 16, 2014 02:04 IST2014-11-16T02:04:42+5:302014-11-16T02:04:42+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा प्रक्रियेला जागतिक पातळीवरही विरोध होणो निश्चित असून यास राजकीय दबावापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले.

सुधारणा प्रक्रियेला राजकीय दबावापासून दूर ठेवा
जी-20 शिखर परिषद : पंतप्रधान मोदींचे समूहाच्या नेत्यांना आवाहन; विरोध होणारच, परंतु सुधारणांची कास अजिबात सोडू नये
ब्रिस्बेन : देशात आर्थिक सुधारणा राबविण्यासाठी प्रयत्न सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुधारणा प्रक्रियेला जागतिक पातळीवरही विरोध होणो निश्चित असून यास राजकीय दबावापासून दूर ठेवण्याचे आवाहन केले. जी 2क् शिखर परिषदेपूर्वी येथे आयोजित स्नेहभोजन समारंभात ते बोलत होते.
सुधारणा प्रक्रियेचे सुलभीकरण होण्याची गरज असून प्रशासन सुधारले पाहिजे, असे आवाहन त्यांनी जी 2क् समूहाच्या नेत्यांना केले. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान टोनी अबॅट यांनी क्वीन्सलँड संसद भवनात जी 2क् समूहाच्या वार्षिक परिषदेपूर्वी या स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. यामध्ये समूह देशांच्या नेत्यांनी आपल्या सहायकांशिवाय परस्परांशी संवाद साधला. ब्रिस्बेन कन्व्हेंशन सेंटरमध्ये ही परिषद होणार आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, सुधारणा प्रक्रियेला विरोध होणो, हे निश्चित आहे. मात्र, राजकीय दबावापासून ही प्रक्रिया मुक्त असली पाहिजे. सुधारणा प्रक्रिया नागरिकांना राबविण्याची गरज असून ती छुप्या पद्धतीने अमलात आणली जाऊ शकत नाही.
सुधारणा प्रक्रिया लोककेंद्रित व जनतेद्वारा संचालित होण्याची गरज आहे. सुधारणा प्रक्रिया हा सरकारी कार्यक्रम असून यामुळे लोकांवर बोजा पडतो, या धारणोमुळे सुधारणांना अपंगत्व येते. यामध्ये तातडीने बदल करण्याची गरज आहे.
सुधारणा ही सातत्यपूर्ण प्रक्रिया असून त्यासाठी संस्थात्मक पद्धती असणो अनिवार्य आहे. तंत्रज्ञानाधिष्ठित आणि समस्यांना थेट भिडणारी व्यवस्था असावी लागते, असे पंतप्रधानांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
नेत्यांचे संमेलन.. ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे शनिवारपासून भरलेल्या दोन दिवसांच्या जी-2क् शिखर परिषदेस चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग (डावीकडे समोर), अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा (समोर मध्यभागी), पंतप्रधान नरेंद्र मोदी, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून आदी उपस्थित होते.
जगातील मोठय़ा अर्थव्यवस्था असलेल्या 2क् देशांच्या प्रमुखांची ही परिषद यंदा ऑस्ट्रेलियाने आयोजित केली आहे.
च्नवी दिल्ली : म्यानमारची राजधानी ने पी ताव येथे तब्बल 18 देशांचे प्रमुख शिखर परिषदेला आलेले असले तरी सगळ्यात जास्त व्यस्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. आणि ही व्यस्तता संपलेली नाही, कारण त्यांचा बहुप्रतीक्षित असा ऑस्ट्रेलिया दौरा लगेचच सुरू झालेला आहे.
शिखर परिषदेच्या अठरा नेत्यांपैकी सर्वात व्यस्त होते नरेंद्र मोदी
च्ने पी ताव येथे मोदी यांनी तीन दिवसांत या शिखर परिषदेला आलेल्या नेत्यांपैकी आठ जणांशी द्विपक्षीय चर्चा केली. 11 तारखेला मोदी म्यानमारचे अध्यक्ष यू थिन सिन यांना भेटले. दुस:या दिवशी ते थायलंड, मलेशिया, ब्रुनेई आणि सिंगापूरच्या नेत्यांना भेटले. गुरुवारी मोदींनी रशिया, चीन व इंडोनेशियाच्या नेत्यांची भेट घेतली.
पुतीन अध्र्यातून परिषद सोडणार
च्युक्रेन प्रकरणी पाश्चात्य देशांच्या प्रखर टीकेचा सामना करणारे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी जी 2क् परिषदेतून माघारी परतण्याचा निर्णय घेतला आहे.
रशियाच्या या निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्था पुनर्जीवित करणो तथा इबोला आजार यासारख्या समस्यांवरुन या शिखर परिषदेचे लक्ष विचलित होण्याचा धोका आहे.
सूत्रंनी सांगितले की, दुस:या दिवशी (रविवारी) परिषदेची कार्यक्रम पत्रिकेत फेरफार करुन ती छोटी केली जाणार आहे. पुतीन हे रविवारी परिषदेच्या सत्रंमध्ये सहभागी होतील, मात्र दुपारचे अधिकृत भोजन व पत्रकार परिषदेस ते उपस्थित राहणार नसल्याचे समजते.
च्दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शिखर परिषदेपूर्वी ब्रिक्स देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेतही परदेशातील बेहिशेबी काळा पैसा मायदेशी आणण्यास सर्वोच्च प्राधान्य असल्याचे नमूद केले. यासाठी जागतिक सहकार्य आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
च्ब्रिस्बेन : परदेशातील बेहिशेबी काळा पैसा परत आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे नमूद करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी जी-2क् शिखर परिषदेच्या मंचावरून जोरदार मोर्चेबांधणी केली. दरम्यान, काळा पैसा मायदेशी आणण्यासाठी सरकारवरील दबाव दिवसेंदिवस वाढत आहे.
च्पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी हे प्रथमच जी 2क् शिखर परिषदेत सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांनी परदेशातील बेहिशेबी काळा पैसा मायदेशी आणण्याबद्दलची आपली वचनबद्धता स्पष्ट केली. आर्थिक सुधारणांना राजकारणापासून दूर ठेवण्याच्या गरजेकडेही त्यांनी लक्ष वेधले.
च्उल्लेखनीय म्हणजे, बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे करचोरीसाठी लक्झमबर्गकडे करात कपात करण्यासाठी हातमिळवणी केली जात आहे. दुसरीकडे भ्रष्टाचारविरोधी संस्था प्रमुख अर्थव्यवस्थांना सीमेबाहेरून येणारा अवैध धनप्रवाह रोखण्याची मागणी करीत आहेत. या पाश्र्वभूमीवर जी 2क् देशांची दोन दिवसीय शिखर परिषद होत आहे.
‘जादू की झप्पी’ देत पंतप्रधानांचे स्वागत
च्ब्रिस्बेन : जी-2क् शिखर परिषदेसाठी जगभरातील प्रमुख देशांतील दिग्गज नेत्यांचे आगमन होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यजमान ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अबॅट यांनी मोठय़ा उत्साहात स्वागत केले. अॅबॉट यांनी मोदी यांची गळाभेट घेतली.
च्1986 साली तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली होती. यानंतर प्रथमच भारतीय पंतप्रधान ऑस्ट्रेलिया दौ:यावर गेले आहेत.
मनापासून संवाद साधा..
च्अॅबॉट यांनी पूर्व लिखित भाषण करण्याच्या परंपरेला फाटा देत अनौपचारिक संवाद साधण्याचे आवाहन परिषदेत सहभागी झालेल्या नेत्यांना केले आहे.
जागतिक नेत्यांशी चर्चा
च्पंतप्रधानांनी आपल्या तीन देशांच्या 1क् दिवसीय दौ:याच्या पाचव्या दिवशी शनिवारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यासह अनेक जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली.
पंतप्रधान ऑस्ट्रेलिया व फिजीमध्ये उर्वरित दिवसांत अन्य काही नेत्यांशी बातचीत करणार आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हार्पर आदी नेत्यांशी ब्रिस्बेन येथे झालेल्या एका समारंभात बातचीत केली.
दहशतवादाविरुद्ध
सामूहिक लढा हवा
ब्रिस्बेन : जागतिक दहशतवादाविरोधात सर्वच देशांनी सामूहिक लढा उभारल्यास यात यशप्राप्ती होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. जी 2क् शिखर परिषदेच्या अनुषंगाने फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद यांच्याशी झालेल्या बैठकीत पंतप्रधानांनी ही भूमिका स्पष्ट केली.
इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेविरोधातील मोहिमेचे नेतृत्व अमेरिका करीत असतानाच मोदींनी हे आवाहन केले आहे. (वृत्तसंस्था)
अमेरिकी संरक्षणमंत्री चक हेगेल यांनी इसिसविरोधी लढा अमेरिकेच्या नेतृत्वात आणखी प्रखर करण्याची घोषणा केली होती. एवढेच नाही, तर हेगेल यांनी अमेरिकी जनतेला दीर्घ पल्ल्याच्या लढाईसाठी तयार राहण्याचे आवाहन केले आहे.
इसिस ही अल् कायदापासून वेगळे झालेली दहशतवादी संघटना आहे. इसिसने इराकमधील हजारो मैल भूभागावर कब्जा मिळविला आहे.
(वृत्तसंस्था)