सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2025 17:31 IST2025-06-22T17:28:12+5:302025-06-22T17:31:55+5:30
Jyeshtha Som Pradosh Shivratri June 2025 Shiv Mantra: सोम प्रदोष आणि शिवरात्रि व्रतात काही शिव मंत्रांचे यथाशक्ती जप करणे अत्यंत प्रभावी मानले गेले आहे. चंद्राशी निगडीत कोणते उपाय अन् मंत्रांचे जप करावेत? जाणून घ्या...

सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
Jyeshtha Pradosh Shivratri June 2025 Shiv Mantra: सोमवार, २३ जून २०२५ रोजी अद्भूत योग जुळून आला आहे. प्रदोष आणि शिवरात्रि व्रत एकाच दिवशी आले आहेत. सोमवार हा दिवस महादेवांना समर्पित असतो. त्यामुळे या दोन्ही व्रतांचे आणि दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जात आहे. प्रदोष व्रत प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षांत म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रत पाळले जाते. तसेच प्रत्येक महिन्यात मासिक शिवरात्रि व्रताचे आचरण केले जाते. सोम प्रदोष व शिवरात्रि व्रत पूजन करताना काही मंत्रांचे यथाशक्ती जप करणे, लाभाचे मानले जाते. जाणून घेऊया...
प्रदोष व्रत तिथी सोमवारी येते तेव्हा त्याला सोम प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष आणि शिवरात्रि ही दोन्ही व्रते महादेवांना समर्पित असून, दोन व्रते एकाच दिवशी येणे शुभ संयोग मानला जात आहे. प्रदोष आणि शिवरात्रि या महादेवांना समर्पित असून, या दिवशी केलेले महादेवांचे पूजन पुण्य फलदायी तसेच शुभ लाभदायी मानले गेले आहे. सोम प्रदोषाच्या दिवशी कुंडलीतील चंद्र ग्रह मजबूत होण्यासाठी चंद्रदेवाशी निगडीत गोष्टी अर्पण कराव्यात, दानधर्म करावा, चंद्रदेवाचे मंत्र जपून नामस्मरण करावे, असे म्हटले जाते.
चंद्र ग्रहाच्या कोणत्या मंत्रांचा जप करावा?
दधिशंखतुषाराभं क्षीरोदार्णव संभवम्। नमामि शशिनं सोमं शंभोर्मुकुट भूषणम्॥, हा नवग्रह मंत्रातील चंद्राचा मंत्र आहे. याशिवाय, ॥ ॐ सों सोमाय नम:॥, ॥ ॐ श्रां श्रीं श्रौं स: चन्द्रमसे नम:॥ हे चंद्राचे प्रभावी मंत्र मानले जातात. ॥ ॐ पद्मद्वाजय विद्महे हेमा रूपाय धीमहि तन्नो चंद्र: प्रचोदयात् ॥, हा चंद्राचा गायत्री मंत्र आहे. कुंडलीतील चंद्राची स्थिती कमकुवत असेल तर प्रतिकूल प्रभाव कमी होण्यासाठी काही उपाय सांगितले जातात. यामध्ये महादेव शंकराची उपासना करणे, सोमवारचे विशेष व्रत करणे, पौर्णिमेचे व्रत करणे, चंद्र मंत्राचा यथाशक्ती किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने जप-जाप करणे, चंद्राचे रत्न मोती धारण करणे, चंद्राशी संबंधित वस्तू जसे की, दूध, चांदी, पांढरे वस्त्र यांचे दान करणे, असे काही उपाय सांगितले जातात.
सोम प्रदोष व शिवरात्रि व्रतात जप करायचे अत्यंत प्रभावी शिव मंत्र
महामृत्युंजय मंत्र
ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम्
उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात्॥
मृत्युंजयाय रुद्राय नीलकण्ठाय शम्भवे। अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः।।
शिव नामावली मंत्र
।। श्री शिवाय नम:।।
।। श्री शंकराय नम:।।
।। श्री महेश्वराय नम:।।
।। श्री सांबसदाशिवाय नम:।।
।। श्री रुद्राय नम:।।
।। ॐ पार्वतीपतये नम:।।
।। ॐ नमो नीलकण्ठाय नम:।।
शिव गायत्री मंत्र
ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि, तन्नो रुद्रः प्रचोदयात्।
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.