शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

मांझी यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्या! राजदचे पप्पू यादव धावले मदतीला

By admin | Updated: February 11, 2015 23:19 IST

मांझी यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्या!

मांझी यांना मुख्यमंत्रिपदी राहू द्या!
राजदचे पप्पू यादव धावले मदतीला

नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवू नका, त्यांना मुख्यमंत्री म्हणूनच राहू द्या, असे राजदचे खासदार राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव यांनी म्हटले आहे. राजद अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी मांझींना हटविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
जदयू अध्यक्ष शरद यादव यांनी नितीशकुमार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यासाठी बोलावलेली बैठक अवैध आणि घटनाबाह्य होती, हे पाटणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे, असे यादव म्हणाले. उच्च न्यायालयाने बुधवारी नितीशकुमार यांच्या निवडीला स्थगिती दिली, हे येथे उल्लेखनीय.
आपल्याला सांप्रदायिकतेविरुद्ध लढायचे असेल तर सामाजिक न्यायाच्या विचारसरणीला कमजोर करून चालणार नाही. बिहारमध्ये सामान्य माणसाला नायक म्हणून सादर करणे गरजेचे आहे, असे पप्पू यादव म्हणाले.
आमदारांना बंदी बनविल्याचा पासवान यांचा आरोप
दरम्यान जदयू आमदारांना उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथे बंदी बनविण्यात आल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि लोजपा अध्यक्ष रामविलास पासवान यांनी केला आहे. मांझी यांनी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी या बंदी आमदारांची सुटका केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
मांझींना पाठिंब्याचा निर्णय विधानसभेत घेऊ-भाजप
बिहारमधील राजकीय परिस्थिती हा जदयूचा अंतर्गत मामला आहे. त्याच्याशी आपल्याला काही देणेघेणे नाही, असे नमूद करून मुख्यमंत्री जितनराम मांझी यांना पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय विधानसभेत घेतला जाईल, असे भाजपाने स्पष्ट केले आहे.
या परिस्थितीसाठी नितीशकुमार जबाबदार आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. त्यांच्यातील सत्तापिपासा वाढली आहे, असा आरोप भाजपाचे प्रवक्ते शाहनवाज हुसैन यांनी केला. (वृत्तसंस्था)