काश्मिरी पंडिताची दहशताद्यांकडून हत्या; टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2022 06:43 IST2022-10-16T06:43:11+5:302022-10-16T06:43:45+5:30

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे.

kashmiri pandit killed by terrorists shocking incident of target killing | काश्मिरी पंडिताची दहशताद्यांकडून हत्या; टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना

काश्मिरी पंडिताची दहशताद्यांकडून हत्या; टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना

श्रीनगर: काश्मीरमध्ये पुन्हा एकदा टार्गेट किलिंगची धक्कादायक घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी शाेपियान जिल्ह्यात एका काश्मिरी पंडिताची गाेळ्या झाडून हत्या केली. 

पुरण कृष्ण भट असे काश्मिरी पंडिताचे नाव असून, चाैधरी गुंड येथील रहिवासी हाेते. ते घराजवळील त्यांच्या फळबागेत कामासाठी जात हाेते.  दहशतवाद्यांनी हीच वेळ साधून त्यांच्यावर गाेळीबार केला. भट यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हत्येची जबाबदारी ‘केएफएफ’ या दहशतवादी संघटनेने घेतली आहे. यावर्षी १५ जणांची दहशतवाद्यांनी टार्गेट किलिंगद्वारे हत्या केली आहे.

कुटुंबीयांना धक्का

पुरण कृष्ण भट यांच्या नातेवाइकांनी सांगितले की, ९० च्या दशकात काश्मिरी पंडितांना काश्मीर सोडण्यास भाग पाडले हाेते. त्या काळातही त्यांनी पलायन केले नव्हते. भट यांना दाेन मुले आहेत. या घटनेनंतर आम्ही सर्व भयभीत झालाे आहेत. (वृत्तसंस्था)

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: kashmiri pandit killed by terrorists shocking incident of target killing