काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 03:10 AM2019-09-10T03:10:48+5:302019-09-10T03:11:07+5:30

कार्यालयात कमी उपस्थिती

In Kashmir, restrictions were removed for the most part; But in Srinagar, markets, transport services are closed | काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद

काश्मीरमध्ये बहुतांश भागांतील निर्बंध हटविले; मात्र श्रीनगरमध्ये बाजारपेठा, वाहतूक सेवा बंद

Next

श्रीनगर : ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमध्ये अनेक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यानंतर तब्बल ३६ दिवसांनी सोमवारी काश्मीरमधील बहुतांश भागांत हे निर्बंध हटविण्यात आले आहेत. श्रीनगर शहरातील काही भागांत मात्र अजूनही निर्बंध कायम आहेत. काश्मीरमध्ये सरकारी वगळता बाकीच्या शाळा, बाजारपेठा अद्यापही बंद आहेत, तसेच सार्वजनिक वाहतूक सेवाही सुरू झालेली नाही.
श्रीनगरच्या लाल चौकात सुरक्षा दलांनी जागोजागी लावलेले बॅरिकेड हटविण्यात आले आहेत. मोहरमच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात
काही ठिकाणी रविवारी पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले होते. इंटरनेट, मोबाईल सेवा बंद ठेवण्यात आली.

लँडलाईन मात्र काही ठिकाणी सुरू होती. काश्मीरमध्ये कोणत्याही महत्त्वाच्या मशिदीमध्ये शुक्रवारी नमाज पठणास परवानगी देण्यात आलेली नाही. मोठ्या संख्येने लोक जमल्यास हिंसाचार होऊ शकतो हे ध्यानात घेऊन हे पाऊल उचलण्यात आले आहे.

काश्मीरबाबत संयुक्त राष्ट्रांना चिंता
जिनिव्हा : विशेष दर्जा रद्द केल्यानंतर कोणतीही गडबड होऊ नये यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे तेथील दैैनंदिन जनजीवन सुरळीतपणे चालण्यास अडथळे येत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विभागाच्या उच्चायुक्त मिशेल बॅचलेट यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. जीवनावश्यक गरजा भागविता याव्यात यासाठी हे निर्बंध शिथिल करावेत असे त्यांनी सोमवारी म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेच्या ४२व्या अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी त्या म्हणाल्या की, भारत व पाकिस्तानने काश्मीरी लोकांच्या मानवी हक्कांची जपणूक करावी. काश्मीर व पाकव्याप्त काश्मीरमधील स्थितीबद्दलचे अहवाल संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क विभागाच्या कार्यालयाकडून मला नेहमी मिळत असतात. काश्मीरमध्ये इंटरनेटसेवा बंद असून संचारबंदीही लागू करण्यात आली आहे. स्थानिक नेते, कार्यकर्त्यांपैैकी काही जण अटकेत आहे. ही सर्व चिंताजनक स्थिती आहे.

Web Title: In Kashmir, restrictions were removed for the most part; But in Srinagar, markets, transport services are closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.