काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 10:05 AM2019-08-28T10:05:21+5:302019-08-28T10:05:37+5:30

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे.

kashmir is india internal matter pakistan does not need to interfere says rahul gandhi | काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी

Next

नवी दिल्लीः काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे. काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण असून, पाकला त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचं राहुल गांधींनी सांगितलं आहे. संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींनी ट्विटरच्या माध्यमातून पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. 
ते लिहितात, मी मोदी सरकारच्या अनेक निर्णयांशी असहमत आहे. परंतु मी स्पष्ट करू इच्छितो की, काश्मीर हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. यात हस्तक्षेप करण्यासाठी पाकिस्तान किंवा इतर कोणत्याही देशाला गरज नाही.

जम्मू-काश्मीरमध्ये झालेली हिंसा हीसुद्धा पाकपुरस्कृत असल्याचा आरोपही राहुल गांधींनी केला आहे. पाकिस्ताननं दहशतवादाला खतपाणी घातल्यामुळे एवढी वर्षं जम्मू-काश्मीर अशांत होतं. जगभरातही पाकिस्तानला दहशतवाद्यांचं प्रमुख आश्रयस्थान असल्याच्या नजरेतूनच पाहिलं जातं.  
तर दुसरीकडे केंद्रीय कॅबिनेटची आज एक विशेष बैठक होणार असून, जम्मू-काश्मीरसाठी मोठी घोषणा करण्यात येणार आहे.  केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन सुरू आहे. त्यासाठी अधिनियम लागू करण्याची जबाबदारी केंद्र सरकारवर आहे. केंद्रीय वित्त, कृषी आणि ग्रामीण विकास, उद्योगासहीत मोठी मंत्रालयं आणि विभागातील 15हून अधिक सचिव बैठकीत उपस्थित होते.  विकास कार्यक्रम आणि संपत्ती, कर्मचाऱ्यांच्या वाटपावर चर्चा केली जाणार आहे. तसेच जम्मू-काश्मीरच्या प्रशासनानं राज्याच्या विभाजनावर काम करण्यासाठी तीन समित्या गठीत केल्या आहेत. या तिन्ही समित्या जम्मू-काश्मीरच्या विकासावर काम करत आहेत. तिन्ही समित्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, त्यानुसार त्या समित्या काम करत आहेत. 

Web Title: kashmir is india internal matter pakistan does not need to interfere says rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.