शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

'आमचं ठरलंय'; कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा निर्धार भाजपाला फळणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 13:18 IST

काँग्रेस आणि जेडीएसने उद्या आमदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे.

मुंबई : कर्नाटकातील राजकीय संकटावर उद्या चित्र स्पष्ट होणार असून बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच आमचेही ठरले असल्याचे सांगत उद्याच्या कुमारस्वामी सरकारच्या बहुमत चाचणीवेळची भूमिकाही स्पष्ट केली आहे. 

कर्नाटक विधानसभेमध्ये कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या याचिकेवर निर्णय देताना आमदारांना चाचणीवेळी उपस्थित राहण्यास जबरदस्ती करू शकत नसल्याचे म्हटले होते. तसेच विधानसभा अध्यक्षांनाही राजीनामे मंजूर करण्यासाठी वेळेचे बंध न टाकू शकत नसल्याचे म्हटले होते. यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेस आणि जेडीएसने उद्या आमदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे हा व्हीप बंडखोर आमदारांना लागू होणार नाही. यामुळे मुंबईतील रेनेसॉन हॉटेलमध्ये थांबलेल्या या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका स्पष्ट केले आहे. आम्ही सर्व आमदार सोबत आहोत. आमचा निर्णय ठाम आहे यामुळे उद्या विधानसभेमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे बंडखोर आमदारांनी सांगितले. 

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे 79, जेडीएसचे 37 आणि बसपा 1 असे 117 बहुमत होते. तर भाजपाकडे 105, अपक्ष 1 आणि केपीजेपीचा 1 असे 107 मते आहेत. यापैकी काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या बंडखोर आमदारांचे राजीनामे बहुमत चाचणीच्या आधी मंजूर केले नाहीत तर हे आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. चाचणीवेळी कुमारस्वामी सरकार अल्पमतात असणार आहे. भाजपा 107 विरुद्ध 101 मतांनी जेडीएस-काँग्रेसवर मात करेल. 

काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक! वाचा सविस्तर

 

भाजपला फायद्याचे कसे?कर्नाटकमध्ये काँग्रेसचे 79, जेडीएसचे 37 आणि बसपा 1 असे 117 बहुमत होते. तर भाजपाकडे 105, अपक्ष 1 आणि केपीजेपीचा 1 असे 107 मते आहेत. यापैकी काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या बंडखोर आमदारांचे राजीनामे बहुमत चाचणीच्या आधी मंजूर केले नाहीत तर हे आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. चाचणीवेळी कुमारस्वामी सरकार अल्पमतात असणार आहे. भाजपा 107 विरुद्ध 101 मतांनी जेडीएस-काँग्रेसवर मात करेल. 

 

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणkumarswamyकुमारस्वामीBJPभाजपाcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)