Karnataka Yoga Guru Crime : कर्नाटकची राजधानी बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका योग गुरुवर अल्पवयीन मुलीसह आठ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. 17 वर्षीय पीडितेने राजराजेश्वरी नगर पोलिस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केल्यामुळे प्रकरम उघडकीस आले. आरोपी योग गुरुला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी योग गुरू निरंजन मूर्ती राजराजेश्वरी नगरमध्ये एक योग केंद्र चालवतो. केंद्रात आलेल्या तरुणींसह त्यांनी अंदाजे आठ महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याने एका 17 वर्षीय मुलीवर अत्याचार केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. मुलीने थेट पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी केली, ज्यामध्ये बलात्काराची पुष्टी झाली. त्यानंतर, आरोपी निरंजन मूर्तीला अटक करण्यात आली. त्याच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, गुन्हा दाखल झाला तेव्हा आरोपी पळून गेला होता. मात्र, पोलिसांनी त्याला शोधून अटक केली. चौकशीदरम्यान, त्याने बलात्काराची कबुली दिली. आरोपीवर अनेक निष्पाप मुली आणि महिलांवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. सध्या पोलिस त्या अँगलने तपास करत आहेत. पोलिसांनी पीडित महिलांना तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले आहे. तक्रारदाराची माहिती गुप्त ठेवली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.