शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

भाजपाचे नाराज आमदार आमच्या संपर्कात, काँग्रेसच्या दाव्याने कर्नाटकमध्ये खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 11:48 IST

येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेल्या कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा  उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

बंगळुरू - येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून शांत असलेल्या कर्नाटकच्या राजकारणात पुन्हा एकदा  उलथापालथ होण्याची शक्यता आहे. सत्ताधारी भाजपाचे काही नाराज आमदार काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात असल्याचा दावा काँग्रेस नेते आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे. जारकीहोळी यांच्या या दाव्यामुळे कर्नाटकच्या राजकारणात खळबळ माजण्याची चिन्हे दिसू लागली आहे. सतीश जारकीहोळी यांनी सांगितले की, ''भाजपाच्या काही असंतुष्ट आमदरांनी आमच्या हायकमांडशी संपर्क साधला आहे. आता पुढे काय होते हे पाहावे लागेल. काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. आम्ही प्रत्येकाला पक्षात घेऊ शकत नाही किंवा सर्वांना सोडूही शकत नाही. हे विधानसभा मतदारसंघांच्या स्थितीवर अवलंबून असेल.''''होऊ घातलेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत आम्ही उमेदवारी देऊ, अशी भाजपाच्या काही नेत्यांना अपेक्षा आहे. मात्र आपचा पक्ष निवडणुकीपूर्वी त्याबाबत विचार करेल. मी यासंदर्भात हायकमांडशी चर्चा केली आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आता प्रचारात गुंतले आहेत.''असेही जारकीहोळी यांनी सांगितले.  दरम्यान, येडियुरप्पा सरकार स्थापन झाल्यापासून कर्नाटकमधील राजकीय स्थिती बऱ्यापैकी स्थिर आहे. मे 2018 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मात्र काँग्रेसने जेडीएसला पाठिंबा देत भाजपाला सत्तेपासून दूर ठेवले होते. मात्र त्यानंतर स्थापन झालेले कुमारस्वामी सरकार लोकसभा निवडणुकीच्या निकालांनंतर अंतर्गत हेव्यादाव्यांमुळे 14 महिन्यांतच कोसळले. जुलै महिन्यात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलरच्या मिळून 15 आमदारांनी राजीनामा देत भाजपाची वाट धरली होती. खूप मनधरणी केल्यानंतरही या आमदारांनी पक्षाविरोधातील बंडखोरी मागे घेतली नव्हती. अखेर दोन ते तीन आठवडे चाललेल्या राजकीय नाट्यानंतर कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दरम्यान, आता येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखालील सरकार काहीसे स्थिर असल्याचे दिसत असतानाचा काँग्रेस आमदारांच्या या वक्तव्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकता अस्थिरतेचे ढग दाटू लागले आहेत. दरम्यान काही दिवसांत होणारी विधानसभेची पोटनिवडणूक भाजपासाठी महत्त्वपूर्ण ठररणा आहे. सरकार स्थिर करण्यासाठी भाजपाला या पोटनिवडणुकीत किमान 6 जागा जिंकाव्या लागतील. सध्या कर्नाटक विधानसभेत भाजपाकडे 106 आमदारांचे पाठबळ आहे.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस