'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 11:28 IST2025-07-26T11:11:01+5:302025-07-26T11:28:56+5:30
महिला कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या सहकाऱ्यांवर असभ्य वर्तनाचा आरोप केल्यानंतर हाणामारी सुरू झाली.

'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
कर्नाटककाँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांचा एकमेकांबरोबर वाद झाला. हा वाद इतका वाढला की कर्नाटक भवनमध्ये दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला, त्यानंतर औपचारिक तक्रारी दाखल करण्यात आल्या आणि प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी सी मोहन कुमार आणि उपमुख्यमंत्र्यांचे विशेष अधिकारी एच अंजनेय यांच्यात ही हाणामारी झाली. मोहन कुमार यांनी सर्वांसमोर अंजनेय यांना धमकी दिल्याचे आणि त्यांना मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात येत आहे. ही संपूर्ण घटना इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत घडली.
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली
एच. अंजनेय यांनी याप्रकरणी अतिरिक्त निवासी आयुक्त आणि कर्नाटकच्या मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना औपचारिक तक्रार दिली आहे. पत्रात अंजनेय यांनी लिहिले आहे की, "जर माझ्यासोबत कोणताही दुर्घटना घडली तर मोहन कुमार जबाबदार असतील, मोहन कुमार यांनी यापूर्वीही एका व्यक्तीसोबत हिंसक वर्तन केले होते, असा त्यांनी आरोप केला. "मला बुटाने मारण्यात आले, यामुळे माझी प्रतिष्ठा आणि स्वाभिमान दुखावला आहे. त्याच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करावा आणि मला न्याय मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.
त्यांच्यातील हा वाद शाब्दिक वादाने सुरू झाला, पण कर्नाटक भवनातील काही महिला कर्मचाऱ्यांनी उपमुख्यमंत्र्यांचे अधिकारी एच. अंजनेय यांच्यावर अपशब्द आणि असभ्य शब्द वापरल्याचा आरोप केलाय. महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मोहन कुमार यांनी अंजनेयांशी या प्रकरणाबद्दल बोलले, यामुळे प्रकरण आणखी तापले. दोन्ही अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वादविवाद आणि आरोप-प्रत्यारोप झाले.
संध्याकाळी महिला कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि उपमुख्यमंत्र्यांच्या अधिकाऱ्याच्या वर्तनाबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी अतिरिक्त निवासी आयुक्तांना महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीची चौकशी करण्याचे आणि आवश्यक असल्यास औपचारिक चौकशी सुरू करण्याचे निर्देश दिले. या संपूर्ण घटनेने कर्नाटकच्या राजकारणातील अंतर्गत कलह आणि गटबाजी पुन्हा एकदा उघडकीस आली आहे.