VIDEO: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा चूक, एक तरुण मोदींच्या दिशेनं धावत आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2023 20:04 IST2023-03-25T20:03:19+5:302023-03-25T20:04:56+5:30

कर्नाटकात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्याची घटना समोर आली आहे.

karnataka pm security lapses for second time a man came running towards narendra modi | VIDEO: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा चूक, एक तरुण मोदींच्या दिशेनं धावत आला अन्...

VIDEO: पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत पुन्हा एकदा चूक, एक तरुण मोदींच्या दिशेनं धावत आला अन्...

बंगळुरू-

कर्नाटकात पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत चूक झाल्याची घटना समोर आली आहे. मोदींच्या रॅलीत एका तरुणानं घुसण्याचा प्रयत्न केला. तीन महिन्यात दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत गडबड झाली आहे. संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. घटनवेळी पोलीस सुरक्षा तैनात होती. 

तरुणानं मोदींच्या दिशेनं घाव घेतली असता पोलिसांनी तातडीनं त्याला अडवलं आणि ताब्यात घेतलं आहे. पोलिसांकडून तरुणाची चौकशी केली जात आहे आणि त्याची सर्व माहिती घेतली जात आहे. 

दावणगेरे येथे ही घटना घडली आहे. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. पंतप्रधान मोदींचा रोड शो याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला गर्दी जमा झाली होती आणि मोदींच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या जात होत्या. याचवेळी एका तरुणानं बॅरिकेट ओलांडून मोदींच्या दिशेनं जाण्याचा प्रयत्न केला. मोदींच्या जवळ जाण्याची ही घटना गंभीर मानली जात आहे. 

यापूर्वी १२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटकातील हुबळी येथे रोड शो केला होता. यादरम्यान एक लहान मुलगा पीएम मोदींना पुष्पहार अर्पण करण्यासाठी आला होता. तेव्हाच सोबत असलेल्या सुरक्षा कर्मचार्‍यांनी मुलाच्या हातातून पुष्पहार काढून पीएम मोदींना दिला आणि मुलाला तात्काळ ताफ्यातून बाहेर केलं होतं.

Web Title: karnataka pm security lapses for second time a man came running towards narendra modi