शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
3
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
4
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
5
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
6
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
7
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
8
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
9
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
12
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
13
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
14
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
15
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
16
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

Karnataka News: बाप ४ वर्षांच्या मुलाचा मृतदेह घेऊन चालला होता, न्यायासाठी कुमारस्वामींच्या रॅलीत नेऊन ठेवला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2022 12:34 PM

कर्नाटकाच्या कोडिजेनहळ्ळीमध्ये एका चार वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने राज्यातील सरकारला खडबडून जागे केले आहे.

कर्नाटकाच्या कोडिजेनहळ्ळीमध्ये एका चार वर्षांच्या मुलाच्या मृत्यूने राज्यातील सरकारला खडबडून जागे केले आहे. माजी मुख्यमंत्री कुमारस्वामींची रॅली सुरु असताना त्या मृत मुलाच्या बापाने न्यायासाठी मृतदेह रॅलीत आणला आणि खळबळ उडाली. आपल्या मुलाला वेळेवर उपचार मिळाले नाही, त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप बापाने केला आहे. हे दृश्य पाहून उपस्थितांचे मनही हेलावले होते. 

हा मुलगा पाण्याच्या टाकीत पडला होता. त्याला लगेचच सरकारी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र त्याचा मृत्यू झाला. तशाच विशन्न अवस्थेत त्याचे आईवडील त्याला घेऊन घरी येत होते. तेवढ्यात वाटेत कुमारस्वामींची रॅली सुरु असल्याचे पित्याने पाहिले आणि मुलाचा मृतदेह थेट कुमारस्वामींकडे नेऊन ठेवला. कोणाला काही कळण्याचा मार्ग नव्हता. कुमारस्वामींच्या स्थानिक नेत्याने त्या मुलाचा मृतदेह हातात घेतला. मुलाच्या बापाने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी कुमारस्वामींकडे केली. 

कुमारस्वामींनी तिथूनच अधिकाऱ्यांना फोन लावला आणि माहिती घेतली. कोडिहळ्ळी सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर हजर नव्हते. यामुळे उपचारास विलंब झाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कुमारस्वामींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही फोन लावले, त्यांच्याकडून कुटुंबाला नुकसान भरपाई आणि अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन घेतले. 

या धक्कादायक प्रकाराची माहिती आरोग्य मंत्र्यांना मिळताच त्यांनी विभागिय चौकशीचे आदेश दिले. कोडीहळ्ळी हे दोन डॉक्टरांच्य़ा जबाबदारीखाली २४ तास सुरु असणारे हॉस्पिटल आहे. यामुळे तिथे एकतरी डॉक्टर असायला हवा होता, असे सुधाकर यांनी सांगितले. तसेच डॉक्टर आणि विलंबाने येणाऱ्या अॅम्बुलन्स चालकावरदेखील निलंबनाची कारवाई केली आहे. मुलगा सव्वाचारच्या सुमारास पाण्यात पडला होता, त्याला पाच वाजता ह़ॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होते असेही सांगितले जात आहे. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटक