शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka New CM: सिद्धरामैय्या मुख्यमंत्री होण्याचं जवळपास निश्चित; डीके शिवकुमार यांच्याकडे महत्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2023 13:45 IST

Karnataka New CM Face: आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होऊ शकते.

Karnataka New CM Face:कर्नाटकात विजय मिळवल्यानंतर आता काँग्रेससमोर मुख्यमंत्री ठरवण्याचे मोठे आव्हान आहे. कर्नाटकचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याची घोषणा आज(मंगळवारी) सायंकाळी होऊ शकते. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आज कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करू शकतात. सिद्धरामैय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडू मिळू शकते, अशी माहिती समोर येत आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसने कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेचा फॉर्म्युला ठरवला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार सिद्धरामैय्या यांना पुन्हा एकदा कर्नाटकचे मुख्यमंत्री केले जाणार आहे. तर, डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रिपदासह एक महत्वाचे खाते देण्यात येणार आहे. यासोबतच डीके यांच्याकडेच प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असेल. 

सिद्धरामय्या यांचे नाव पुढेकाँग्रेसकडून अद्याप अधिकृत घोषणा होणे बाकी आहे, परंतु सिद्धरामेय्या राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. डीके शिवकुमार यांच्यापेक्षा सिद्धरामय्या यांचा दावा मजबूत असल्याचे बोलले जात आहे. सोमवारीच ते दिल्लीत पोहोचले आहेत, तर डीके शिवकुमार आज दिल्लीसाठी रवाणा होणार आहेत.

रविवारी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीत काँग्रेसच्या केंद्रीय निरीक्षकांनी मुख्यमंत्री पदाबाबत त्यांचे मत जाणून घेतले. यामध्ये आमदारांशी स्वतंत्र चर्चा झाली. यासोबतच मुख्यमंत्रिपदासाठी गुप्त मतदान घेण्यात आल्याची माहिती आहे. सोमवारी तीन केंद्रीय निरीक्षकांनी आमदारांच्या गुप्त स्लिप घेऊन नवी दिल्ली गाठली आणि पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना आमदारांचे मत कळवले. काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सिद्धरामय्या यांना शिवकुमारपेक्षा दुप्पट आमदारांचा पाठिंबा आहे.

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गे