Petrol-Diesel Prices Hike : ‘कोरोना नियंत्रणासाठी देशाला पैशांची गरज'; पेट्रोल-डिझेच्या मुद्यावर भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2021 18:37 IST2021-10-20T18:35:03+5:302021-10-20T18:37:15+5:30
ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 106 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. तर मुंबईत हाच दर 112 रुपये प्रति लीटरच्याही पुढे गाला आहे.

Petrol-Diesel Prices Hike : ‘कोरोना नियंत्रणासाठी देशाला पैशांची गरज'; पेट्रोल-डिझेच्या मुद्यावर भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
देशात पेट्रोल-डिझेलचे (Petrol- Diesel Price) दर गगनाला भिडले आहेत. कर्नाटकातपेट्रोल आणि डिझेलची किंमत 100 रुपयांच्याही पुढे गेली आहे. यासंदर्भात आता कर्नाटकचे मंत्री उमेश विश्वनाथ कट्टी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. कट्टी म्हणाले, इंधनाच्या वाढत्या किंमतींचे कारण कोरोना महामारी आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक व्यवहार तथा वन मंत्री कट्टी म्हणाले, “कोरोना महामारीला नियंत्रित करण्यासाठी मोठा खर्च येत आहे. इंधनाचे दर वाढले आहेत, कारण सरकारला या साथीच्या आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी पैशांची आवश्यकता आहे. हा प्रश्न लवकरच सोडविला जाईल.
महत्वाच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर -
ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 106 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. तर मुंबईत हाच दर 112 रुपये प्रति लीटरच्याही पुढे गाला आहे. कोलकात्यात पेट्रोल सुमारे 107 रुपये प्रति लीटर तर चेन्नईतही 103 रुपये प्रति लीटरच्या पुढे गेले आहे. महत्वाचे म्हणजे, क्वचितच देशात एखादे मोठे शहर असे असेल, जेते पेट्रोल 100 रुपये प्रति लिटर पेक्षा स्वस्त असेल.
गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरातही अशीच वाढ होत आहे. राष्ट्रीय राजधानीत डिझेलचा दर सुमारे 95 रुपये आणि मुंबईत सुमारे 103 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये डिझेल 98 रुपये प्रति लीटर तर चेन्नईमध्ये 99 रुपये प्रति लीटर विकले जात आहे.