'डोकं धडापासून वेगळं करुन तुकडे-तुकडे करू', केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंना जीवे मारण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:16 IST2018-04-23T13:08:08+5:302018-04-23T13:16:14+5:30

केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे.

karnataka minister anant kumar hegde allegedly received a threat call fir lodged | 'डोकं धडापासून वेगळं करुन तुकडे-तुकडे करू', केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंना जीवे मारण्याची धमकी

'डोकं धडापासून वेगळं करुन तुकडे-तुकडे करू', केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडेंना जीवे मारण्याची धमकी

नवी दिल्ली - केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना अज्ञाताकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. अनंत हेगडे यांना रविवारी (22 एप्रिल) उशिरा रात्री धमकीचा फोन आला होता. 'डोकं धडापासून वेगळं करुन शरीराचे तुकडे तुकडे करू', अशी धमकी हेगडेंना देण्यात आली. हेगडे यांनी याप्रकरणी सिरसी न्यू मार्केट पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अनंतकुमार हेगडेंच्या मोबाइलवर रविवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास अज्ञात क्रमांकावरुन फोन आला. यानंतर काही वेळानं घरातील फोनवरदेखील फोन आला. हा फोन हेगडे यांच्या पत्नीनं उचलला. समोरील व्यक्ती कन्नड भाषेत बोलत होता आणि विचापूस केल्यानंतर त्यानं फोन ठेऊन दिल्याची माहिती त्यांच्या पत्नींनी दिली. यानंतर अनंतकुमार हेगडेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. 




तुम्ही स्वतःला खूप मोठे नेते समजता, आम्ही तुमचे डोकं धडापासून वेगळं करू आणि तुमचं शरीर तुकड्या-तुकड्यांमध्ये कापू, अशी धमकी हेगडेंना देण्यात आली.  हेगडे यांनी याबाबतची माहिती ट्विटवर दिली आहे.   


यापूर्वी 18 एप्रिलला अनंतकुमार हेगडे यांच्या कारला एका ट्रकने धडकदेखील दिली होती. या अपघातात हेगडे थोडक्यात बचावले होते. आपल्याला जाणूनबुजून मारण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.  



 



 

Web Title: karnataka minister anant kumar hegde allegedly received a threat call fir lodged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.