शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात एक्झिट पोलच्या उलटे निकाल, भाजपाच्या किती जागा आघाडीवर? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 15:22 IST

Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात लोकसभेच्या निवडणुका चुरशीने झाल्या आहेत. दरम्यान, आता लोकसभेचे निकाल समोर आले आहेत.

Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात लोकसभा निवडणूक चुरशीने झाली. कर्नाटक लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. कर्नाटकात भाजपा १६ जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेस १० जागांवर आघाडीवर आहे. दोन दिवसापूर्वी एक्झिट पोल आले होते, या पोलमध्ये कर्नाटकात एनडीएला २३ ते २५ जागा मिळतील असा अंदाज देण्यात आला होता. तर, इंडिया आघाडीला ३ ते ५ जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता. दरम्यान, आता एक्झिट पोलच्या उलट निकाल लागल्याचे दिसत आहे. 

Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : झिरो झिरो म्हणता अजित पवारांच्या वाट्याला एक जागा; महाराष्ट्रात कोण पुढे? १ वाजेपर्यंतचे आकडे आले समोर

कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील जनता दल यावेळी एनडीएसोबत निवडणुकीच्या रिंगणात असल्याने या लोकसभा निवडणुकीतील लढत दुरंगी झाली. भारतीय जनता पक्ष कर्नाटकात २०२४ च्या लोकसभा निवडणुका माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा आणि त्यांचे पुत्र एचडी कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील जनता दल यांच्यासोबत युती केली. 

कर्नाटकात लोकसभेच्या २८ जागा आहेत. येथे दोन टप्प्यात मतदान झाले. दोन्ही टप्प्यात प्रत्येकी १४ जागांवर मतदान झाले. एकूण जागांपैकी भाजपचे उमेदवार २५ जागांवर तर जनता दल उमेदवार ३ जागांवर निवडणूक लढले आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. 

महाराष्ट्रात कोण पुढे?

महाराष्ट्रातील निकाल समोर आले आहेत. दोन दिवसापूर्वी एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी १२ ते १५ जागांवर आघाडी घेऊ शकते असं दाखवण्यात आलं होतं, तर महायुती राज्यात २८ ते ३० जागांवर आघाडी घऊ शकते असं दाखवण्यात आलं होतं. पण, दुपारी १ वाजेपर्यंत आलेले निकाल या उलट असल्याचे दिसत आहे. राज्यात महाविकास आघाडी २७ जागांवर आघाडीवर आहे, तर महायुती २० जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

विदर्भातही महाविकास आघाडीच्या जागा आघाडीवर असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातही तशीच परिस्थिती दिसत आहे. दरम्यान, राज्यात चुरशीची लढत दिसत आहे. 

दरम्यान, बारामती लोकसभा मतदार संघात १ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार खासदार सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत. रायगड लोकसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे खासदार सुनिल तटकरे आघाडीवर आहेत. माढा लोकसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघात आमदार प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या, तर राम सातपुते पिछाडीवर होते. दरम्यान, राज्यात अनेक मतदारसंघात चुरशीची लढत सुरू असल्याचं दिसत आहे. 

टॅग्स :karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालBJPभाजपाcongressकाँग्रेस