शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटकात कुमारस्वामी सरकार संकटात; काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 17:15 IST

मुख्यमंत्री अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना राज्यात वेगवान घडामोडी

बंगळुरु: स्थापनेपासूनच अस्थिर असलेलं कर्नाटकमधीलकाँग्रेस-जेडीएसचं सरकार मोठ्या संकटात सापडलं आहे. काँग्रेस-जेडीएसच्या 14 आमदारांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिला आहे. हे आमदार राजीनामा सोपवण्यासाठी विधानसभेच्या अध्यक्षांकडे गेले होते. मात्र अध्यक्षांची भेट न झाल्यानं त्यांनी त्यांच्या सचिवांकडे राजीनामा सुपूर्द केला. चौदा आमदारांनी त्यांच्या पदांचा राजीनामा दिल्याच्या माहितीला विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी दुजोरा दिला. मुख्यमंत्री कुमारस्वामी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना कर्नाटकात सत्तेचं नाटक सुरू झालं आहे. त्यामुळे कुमारस्वामी उद्या अमेरिकेतून परतू शकतात. काँग्रेस, जेडीएसचे आणखी काही आमदार राजीनामा देतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे कर्नाटकमधील काँग्रेस-जेडीएस सरकारसमोरील अडचणी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे संकटमोचक डी. के. शिवकुमार त्यांच्या कनकपुरा विधानसभा क्षेत्रातून बंगळुरुत दाखल झाले. सरकार अडचणीत सापडल्यानं उपमुख्यमंत्री जी परमेश्‍वर आणि डी. के. शिवकुमार यांनी काँग्रेस आमदारांची बैठक बोलावली. भाजपाकडून राज्यातील सरकार पाडण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोप डी. के. शिवकुमार यांनी केला. तर राज्यपालांनी सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिल्यास भाजपा बहुमत सिद्ध करेल, असा विश्वास भाजपा नेते डी. व्ही. सदानंद गौडांनी व्यक्त केला. भाजपाच राज्यातील सर्वात मोठा पक्ष असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. काँग्रेस, जेडीएसमध्ये राहून जनहित साधता येणार नाही, हा विचार करुन आमदारांनी राजीनामे दिले असावेत, असंदेखील गौडा यांनी म्हटलं. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणcongressकाँग्रेसkumarswamyकुमारस्वामीBJPभाजपा