शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय पक्षांचे दार चुकले; मतदार याद्यांचा विषय कक्षेत नाही; राजकीय प्रतिनिधींना आयोगाचे उत्तर
2
भारत-पाकच्या खेळाडूंमध्ये ‘हाय फाइव्ह’; हॉकी संघाने सामना संपल्यानंतर हस्तांदोलनही केले
3
मुंबई महापालिका निवडणूक मतपत्रिकेवर घेण्याची मागणी; राज, उद्धव ठाकरेंसह शरद पवारांची मागणी
4
बापरे, काय तो वेग...! बुलेट, रॉकेटचा नाही तर चांदीचा; एकाच दिवसात १५,००० ने वाढली 
5
ईडी कारवाई: वसईचे माजी आयुक्त अनिल पवार, गुप्ताची ७१ कोटींची मालमत्ता जप्त
6
पानसरे हत्या; तीन आरोपींना जामीन मंजूर; सर्वच आरोपी आता जामिनावर बाहेर
7
माओवादी चळवळीने हात टेकले; ‘भूपती’सह ६० जणांची शरणागती
8
इंधन भेसळ प्रकरणात जामीन देताना गंभीरतेने विचार गरजेचा; मुंबई उच्च न्यायालयाचे स्पष्ट मत, एकाचा जामीन फेटाळला
9
कोल्डरिफसह तीन विषारी सिरप वापरू नका, जिवाला असलेला धोका टाळा
10
धारदार शस्त्राने गळा चिरून तरुणाची हत्या; इतर मद्यपींनी पाहिले अन् तिकडे धाव घेतली...
11
सलमान, शाहरूखला पाहण्यास गाठली मुंबई; अनाथ मुलाचा उपाशीपोटी तब्बल २५ तासांचा प्रवास
12
एमबीबीएस प्रवेशासाठी १५२ विद्यार्थ्यांकडून चुकीची कागदपत्रे सादर; सीईटी सेलची नोटीस
13
रणजी करंडक स्पर्धेमध्ये छाप पाडण्यासाठी युवा खेळाडू सज्ज; ऋषभ पंतच्या पुनरागमनावर नजर 
14
भारताने केलेे २-० ने ‘क्लीन स्वीप’; दुसऱ्या कसोटीत वेस्ट इंडिजवर ७ गडी राखून मात
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर येडियुरप्पा यांच्या समर्थकाची आत्महत्या, शांतता राखण्याचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 08:05 IST

Karnataka CM Resigns : नुकताच येडियुरप्पा यांनी दिला होता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा. राजीनामा देताना ते झाले होते भावूक, अश्रूही झाले होते अनावर.

ठळक मुद्देनुकताच येडियुरप्पा यांनी दिला होता मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा.राजीनामा देताना ते झाले होते भावूक, अश्रूही झाले होते अनावर.

कर्नाटकात भाजपचा मोठा चेहरा म्हणून ओळखले जाणारे आणि कर्नाटकचेमुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर मोठ्या कालावधीपासून कर्नाटकात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर पडदा पडला. राजीनामा देण्य़ापूर्वी एका कार्यक्रमात त्यांनी राजीनामा देणार असल्याची घोषणादेखील केली होती. महत्त्वाची बाब म्हणजे सरकारला दोन वर्षे पूर्ण झालेल्या दिवशीच त्यांनी राजीनामा दिला. परंतु त्यांच्या राजीनाम्यानंतर समर्थकांमध्ये नाराजी पसरली आहे. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यात एका ३५ वर्षीय समर्थकानं आत्महत्या करत आपला जीवनप्रवास संपवला.

पोलिसांच्या माहितीनुसार त्या व्यक्तीचं नाव रवि उर्फ रचप्पा असं असून ते कर्नाटकातील चामराजनगर जिल्ह्यातील बोम्मलपूर गावातील रहिवासी होते. ती व्यक्ती मजूर म्हणून काम करत होती, तसंच एका चहाच्या दुकानातही तो काम करत होता, असं पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार तो माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा कट्टर समर्थक होता. परंतु गावकऱ्यांनी असा दावा केला की तो येडियुरप्पा यांचा कट्टर समर्थक होता, परंतु त्यानं कर्जही घेतलं होतं.

परंतु पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं कर्ज घेतल्याची बाब अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेली नाही. तसंच त्याच्याजवळ कोणत्याही प्रकारची सुसाईड नोट मिळाली नाही. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात असल्याचं पोलिसांनी म्हटलं. पोलिसांच्या म्हणण्यानुसार येडियुरप्पा यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर तो चिंतेत होता. तसंच त्यानं यानंतर स्वत:ला एका खोलीत बंद करून घेतलं. त्यानंतर कदाचित त्यानं रात्री आत्महत्या केली असं पोलिसांनी सांगितलं. याशिवाय या प्रकरणी कोणती अन्य बाजू आहे का याचा तपासही पोलीस करत आहेत. 

येडियुरप्पा यांनी व्यक्त केलं दु:खया घटनेची माहिती मिळाल्या येडियुरप्पा यांनी दु:ख व्यक्त केलं. तसंच शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहनही केलं. त्यांनी याप्रकरणी एक ट्वीटही केलं. "प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही चढउतार येत असता. परंतु कोणालाही त्यासाठी आपला बहुमूल्य जीव गमावण्याची गरज नाही," असं ते म्हणाले.

टॅग्स :B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाKarnatakकर्नाटकChief Ministerमुख्यमंत्रीPoliceपोलिस