“मी हिंदू आहे, वाटल्यास बीफही खाऊ शकतो,” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 10:09 IST2022-05-24T10:07:29+5:302022-05-24T10:09:41+5:30

“बीफ खाणारे कोणत्याही एका समुदायाचे नाहीत. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असंही सिद्धरामय्या म्हणाले.

karnataka former cm congress siddaramaiah says i am hindu will eat beef if i want to targets rss | “मी हिंदू आहे, वाटल्यास बीफही खाऊ शकतो,” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य

“मी हिंदू आहे, वाटल्यास बीफही खाऊ शकतो,” कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं वक्तव्य

कर्नाटकातील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे बीफ संदर्भात वक्तव्य करून चर्चेत आले आहेत. “मी हिंदू आहे आणि अजून बीफ खाल्ले नाही. पण हवे असल्यास आपण बीफ खाऊ शकतो. ही आपली मर्जी आहे. आरएसएस लोकांमध्ये भेद निर्माण करत आहे,” असा आरोपही काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केला.

“सिद्धरामय्या तुमकुरूमध्ये एका कार्यक्रमाला संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी यावर वक्तव्य केलं. संघाचे लोक सुमदायांमध्ये भेद निर्माण करत आहेत. बीफ खाणारे केवळ एका समुदायाचे लोक नसतात,” असंही सिद्धरामय्या म्हणाले.

“बीफ खाणारे एका समुदायाचे नाहीत”
“मी हिंदू आहे. परंतु मी आतापर्यंत बीफ खाल्लेलं नाही. परंतु मला वाटल्यास मी ते खाऊ शकतो. तुम्ही माझ्यावर प्रश्न उपस्थित करणारे कोण?,” असा सवालही त्यांनी केला. बीफ खाणारे केवळ एका समुदायाचे नसतात. हिंदूही बीफ खातात, ख्रिस्तीही खातात. इतकंच नाही तर मी एकदा कर्नाटक विधानसभेतही म्हटलं होतं की मी बीफ खावं की नाही हे सांगणारे तुम्ही कोण? हे खाण्याच्या आवडीशी जोडलेला विषय आहे आणि तो आपला अधिकार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

Web Title: karnataka former cm congress siddaramaiah says i am hindu will eat beef if i want to targets rss