शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

Karnataka Elections results 2018 live: काँग्रेस अनुभवातून शहाणा; मतमोजणीआधीच 'सेटिंग'साठी कर्नाटकात पोहोचले 'चाणक्य'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2018 08:35 IST

त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास कशाप्रकारच्या वाटाघाटी करायच्या याची रणनीती आखण्यास सुरुवात

बंगळुरू: मणिपूर आणि गोव्याप्रमाणे कर्नाटकमध्ये कोणताही दगाफटका होऊ नये यासाठी काँग्रेसने सोमवारी रात्रीपासूनच आपल्या चाणक्यांना कामाला लावले आहे. विविध मतदानोत्तर चाचण्यांच्या कौलनुसार कर्नाटकात त्रिशंकू स्थिती राहण्याचे भाकित करण्यात आले आहे. तसेच यामध्ये जनता दल (धर्मनिरपेक्ष) अर्थात जेडीएस किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे काँग्रेसने आकड्यांच्या जुळवाजुळवीकरीता अशोक गहलोत आणि गुलाम नबी आझाद या दोन नेत्यांना कर्नाटकात पाठवले आहे. हे दोन्ही नेते कालच बंगळुरूत दाखल झाले असून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या घरी त्यांची बैठक झाली. या बैठकीत त्रिशंकू परिस्थिती उद्भवल्यास कशाप्रकारच्या वाटाघाटी करायच्या याची रणनीती आखण्यात आल्याची शक्यता आहे. यापूर्वी मणिपूर आणि गोव्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपाच्या राजकीय व्यवस्थापनामुळे काँग्रेसच्या हातातोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला होता. तर दुसरीकडे गुलाम नबी आझाद यांनी भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या कर्नाटकात १३० जागा जिंकण्याचे वक्तव्य खोडून काढले. गुजरातमध्ये त्यांनी १५० जागा मिळतील असे म्हटले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांना किती जागा मिळाल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी नुकतेच दलित नेत्यासाठी आपण खुर्ची सोडायला तयार असल्याचे म्हटले होते. यावरुन काँग्रेसला निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळण्याविषयी शंका असल्याचे बोलले जात आहे. 

 

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८