शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

Karnataka Election Results 2018: मोदी-शहांनी मानले आभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 4:39 AM

काँग्रेसचा राज्यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुपारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा सादर केला.

बंगळुरू/ नवी दिल्ली : काँग्रेसचा राज्यात पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दुपारी राज्यपाल वजुभाई वाला यांची राजभवनात भेट घेतली आणि त्यांना आपला राजीनामा सादर केला. तोपर्यंत काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद व अशोक गेहलोत यांनी जनता दलाचे नेते व माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्याशी चर्चा करून, पाठिंब्याचा प्रस्ताव दिला. त्या पक्षाने तो लगेचच मंजूर केला. त्यानंतर, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनीही देवेगौडा यांच्याशी फोनवर चर्चा केली.हे सुरू असताना भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. या वेळी पंतप्रधान मोदी यांनी कर्नाटकातील जनतेला आम्ही स्वच्छ सरकार देऊ आणि राज्याचा वेगाने विकास घडवू, असे आश्वासन दिले. काही राजकीय पक्ष संघराज्याची संकल्पना मोडीत काढायला निघाले असून, त्यांना कर्नाटकातील जनतेने धडा शिकविला आहे, अशी टीका त्यांनी काँग्रेसचे नाव न घेता केली. भाजपा हा हिंदी राज्यातील पक्ष आहे, अशी टीका आमच्यावर केली जाते, पण महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, त्रिपुरा तसेच ईशान्येकडील राज्ये काय हिंदीतून बोलतात की काय, असा सवाल करून पंतप्रधान म्हणाले की, आजच्या घडीला केवळ भाजपा हाच राष्ट्रव्यापी पक्ष असून, इतर पक्ष एखाद्या वा दोन-तीन राज्यांपुरते सीमित राहिले आहेत. अमित शहा म्हणाले की, कर्नाटकात काँग्रेसचा सर्वात मोठा पराभव झाला असून, राहुल गांधी यांचे नेतृत्व लोकांना मान्य झालेले नाही. त्यामुळे २0१९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाला आणखी मोठे यश मिळेल आणि आम्ही २0२२ पर्यंत नवा भारत उभा करू. शहा यांनी काँग्रेसने राज्यात जाती-पातींचे राजकारण केले आणि दलितांना भडकावण्याचे काम केले, असा आरोपही त्यांनी केला. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपला यशाचा रथ यापुढेही असाच सुरू राहील. मोदी यांनी अमूल्यवेळ दिला आणि त्याचा फायदा पक्षाला मिळाला आहे, असे शहा म्हणाले. (वृत्तसंस्था)>विजयोत्सव थंडावला? : भाजपाला संपूर्ण बहुमत मिळेल, असे त्या पक्षाच्या सर्वच नेत्यांना वाटत होते. त्यामुळे बंगळुरू व दिल्लीत मोठा जल्लोष करण्याचे भाजपाने ठरविले होते, पण जसजसे निकाल येत गेले आणि स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचे स्पष्ट झाले, तसतसे आनंद कमी होत गेला. त्यामुळे दिल्लीतील पक्ष मुख्यालयात विजयोत्सव फार मोठ्या प्रमाणात न करण्याचा निर्णय भाजपाने घेतला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपाKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८