शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
3
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
4
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
5
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
6
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
7
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
8
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
9
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
10
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
11
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
12
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
13
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
14
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
15
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
16
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
17
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
18
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
19
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
20
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

कर्नाटकच्या आमदारांनो केरळमध्ये या; पर्यटन विभागाची 'कूल' ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2018 08:41 IST

केरळ पर्यटन विभागाच्या ऑफरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा

नवी दिल्ली: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला. या निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, तो बहुमतापासून दूर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसनं तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे आता कर्नाटकात फोडाफोडीचं राजकारण होण्याची दाट शक्यता आहे. घोडेबाजाराच्या या संभाव्य शक्यतेवर केरळच्या पर्यटन विभागानं मिश्किल शब्दांमध्ये भाष्य केलं आहे. त्रिशंकू विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदारांनी केरळमधील सुंदर आणि सुरक्षित रिसॉर्ट्समध्ये यावं, असं ट्विट केरळच्या पर्यटन विभागानं केलं. मात्र काही वेळानंतर त्यांनी हे ट्विट डिलीट केलं. कर्नाटक विधानसभेच्या 222 जागांचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या ठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी 112 जागांची आवश्यकता आहे. मात्र पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या भाजपाकडे 104 जागा आहेत. तर काँग्रेसकडे 78 आणि जेडीएसकडे 78 जागा आहेत. काँग्रेसनं जेडीएसच्या साथीनं सत्ता स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तर भाजपानंही सत्ता स्थापन करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर घोडेबाजार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमदारांची पळवापळवीदेखील होऊ शकते. अशा परिस्थितीत अनेकदा राजकीय पक्ष आमदारांना सुरक्षित स्थळी घेऊन जातात. हेच लक्षात घेऊन केरळच्या पर्यटन विभागानं नवनिर्वाचित आमदारांना 'कूल' ऑफर दिली आहे. 'कर्नाटकमधील त्रिशंकू परिस्थितीनंतर आमदारांनी देवभूमी असलेल्या केरळच्या सुरक्षित आणि सुंदर रिसॉर्ट्समध्ये यावं,' असं आमंत्रणच केरळच्या पर्यटन विभागानं दिलं. या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होती. अनेकांनी पर्यटन विभागाच्या कल्पकतेचं कौतुकही केलं. मात्र काही वेळातच हे ट्विट डिलीट करण्यात आलं. काही महिन्यांपूर्वी अण्णाद्रमुकच्या 120 आमदारांना शशीकला  चेन्नईच्या बाहेर घेऊन गेल्या होत्या. पनीरसेल्वम यांनी केलेल्या बंडाला इतर आमदारांची साथ मिळू नये, यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. याशिवाय गेल्याच वर्षी झालेल्या गुजरात राज्यसभेच्या निवडणुकीवेळीही आमदारांची फोडाफोड झाली होती. त्यावेळी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानं अहमद पटेल यांची राज्यसभेची वाट खडतर झाली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या आमदारांना कर्नाटकमधील एका हॉटेलमध्ये नेलं होतं. या घटना लक्षात घेता कर्नाटकमध्येही आमदारांची फोडाफोड होऊ शकते. याच अनुषंगानं केरळच्या पर्यटन विभागानं आमदारांची पळवापळवी, घोडेबाजारावर भाष्य करणारं ट्विट केलं. या ट्विटला 10 हजारहून अधिक लाईक्स मिळाले. सहा हजारपेक्षा अधिक जणांनी हे ट्विट रिट्विट केलं.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेसKeralaकेरळ