शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Karnataka Election Result 2023: बेळगाव जिल्ह्यात सतीश जारकीहोळी, रवी पाटील, विठ्ठल हलगेकर आघाडीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 11:04 IST

निकालांबाबत उत्सुकता वाढली

बेळगाव : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठीची मतमोजणी सुरू झाली आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात काँग्रेसने आघाडी घेतली आहे. काँग्रेसने सत्ताधारी भाजपाला जोरदार टक्कर दिली होती. आरपीडी महाविद्यालयात सुरु झालेल्या पोस्टल मतमोजणीत बेळगाव जिल्ह्यात विविध मतदार संघात विद्यमान आमदारपद भूषवित असलेल्या उमेदवारांनी आघाडी घेतली आहे. यमकनमर्डी मतदार संघातून सतीश जारकीहोळी, ग्रामीण मतदार संघातून लक्ष्मी हेब्बाळकर, गोकाक मतदार संघातून रमेश जारकीहोळी तर निपाणी मतदार संघातून शशिकला जोल्ले आघाडीवर आहेत.  आरपीडी महाविद्यालयात सुरु असलेल्या मतमोजणी केंद्राबाहेर समर्थकांची गर्दी वाढत चालली असून कडेकोट पोलीस बंदोबस्तात तैनात करण्यात आला आहे. २२४ जागा असलेल्या कर्नाटक विधानसभेमध्ये बहुमताचा आकडा ११३ एवढा आहे. दरम्यान, आतापर्यंत हाती आलेल्या निकालामध्ये काँग्रेस १०० पेक्षा जास्त जागेवर आघाडीवर आहे. भाजपा ९८, जेडीएस १९ एवढ्या जागांवर आघाडीवर आहेत. तर कधी भाजपा पिछाडी भरून काढत काँग्रेसला गाठत आहे. त्यामुळे निकालांबाबत उत्सुकता वाढली आहे. भाजपचे डॉ. रवी पाटील आघाडीवर उत्तर मतदार संघात पाचव्या फेरीनंतरदेखील भाजप आघाडीवर असून भाजपचे डॉ. रवी पाटील १७११८ मतांनी आघाडीवर आहेत. त्यानंतर काँग्रेसचे असिफ सेठ १३९८५ मतांनी  दुसऱ्या क्रमांकावर आहेत.खानापुरात भाजपचे हलगेकर आघाडीवर खानापूर मतदार संघात मतमोजणीची सहावी फेरी पूर्ण झाली असून सहाव्या फेरीनंतर भाजपचे विठ्ठल हलगेकर २१८४६ मतांनी आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसच्या अंजली निंबाळकर ७८३० मतांनी दुसऱ्या क्रमांकावर आहेत तर म. ए. समितीचे मुरलीधर पाटील हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत.काँग्रेसचे सतीश जारकीहोळीच आघाडीवरयमकनमर्डी मतदार संघात मतमोजणी सुरु झाल्यापासून काँग्रेसचे विद्यमान आमदार सतीश जारकीहोळीच आघाडीवर आहेत. ४५८६४ मतांनी सहाव्या फेरीनंतर सतीश जारकीहोळी यांनी आघाडी घेतली असून दुसऱ्या क्रमांकावर १८८४० भाजपचे बसवराज हुंदरी आणि १३४५९ मतांनी जेडीएसचे मारुती अष्टगी हे तिसऱ्या क्रमांकावर आहेत. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकResult Dayपरिणाम दिवसcongressकाँग्रेसBJPभाजपा