शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Election 2018 : भाजपा की काँग्रेस? किंगमेकर देवगौडांनी दिले महत्वपूर्ण संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2018 12:42 IST

देवगौडांचा जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा एक्झिट पोल्सचा अंदाज

बंगळुरू: कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता राजकीय पक्षांनी निकालानंतरची जुळवाजुळव सुरू केली आहे. निवडणुकीच्या निकालाला अद्याप दोन दिवस शिल्लक आहेत. मात्र अनेक एक्झिट पोल्समधून कोणत्याही पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचं चित्र पुढे आलं आहे. काँग्रेस आणि भाजपाला बहुमताचा आकडा गाठता येणार नसल्यानं जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर पक्षाचे अध्यक्ष एच. डी. देवेगौडा यांनी निकालानंतरच्या भूमिकेबद्दल महत्त्वपूर्ण संकेत दिले आहेत. 'सध्या कोणतीही ऑफर स्वीकारण्याची किंवा नाकारण्याच्या स्थितीत नाही. 15 मे रोजी मतमोजणी सुरू झाल्यावर काय होतं ते पाहू,' असं देवेगौडा यांनी म्हटलं. देवगौडा यांच्या विधानातून महत्त्वपूर्ण संकेत मिळत आहेत. देवगौडा यांचा पक्ष काँग्रेस किंवा भाजपसोबत सत्ता स्थापन करु शकतो, अशी शक्यता यामधून व्यक्त करण्यात येत आहे. जनता दल सेक्युलर कोणत्याही पक्षासोबत जाणार नाही, अशी भूमिका याआधी देवगौडा यांनी घेतली होती. मात्र शनिवारी आलेल्या एक्झिट पोल्सनंतर त्यांच्या या भूमिकेत मोठा बदल झाला आहे. काँग्रेस आणि भाजपला मिळणाऱ्या जागांमधील अंतर अतिशय कमी असेल. त्यामुळे जनता दल सेक्युलर किंगमेकर होईल, असं बहुतांश एक्झिट पोल्सच्या आकडेवारीतून समोर येत आहे. त्यामुळेच देवगौडा यांनी, सध्या कोणताही प्रस्ताव स्वीकारण्याच्या किंवा नाकारण्याच्या स्थितीत नसल्याचं म्हटलं आहे. जनता दल सेक्युलर किंगमेकर ठरणार असल्याचा अंदाज अनेक एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. मात्र भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा यांनी त्यांच्या पक्षालाच बहुमत मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. '17 मे रोजी भाजपालाच कौल मिळेल, याची खात्री आहे. आम्ही 125 ते 130 जागा जिंकू. मात्र काँग्रेसला 70 जागांचा आकडाही गाठता येणार नाही. तर जनता दल सेक्युलर जास्तीत जास्त 24-25 जागा जिंकेल,' असं येडियुरप्पा यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८h d deve gowdaएच. डी. देवेगौडाAmit Shahअमित शाहBJPभाजपाcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदी