शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
3
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
4
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
5
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
6
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
7
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
8
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
9
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
10
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
11
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
12
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
13
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
14
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
15
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
16
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
17
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
18
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
19
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
20
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार

मुख्यमंत्री म्हणाले, शाळेत असताना होतो 'ढ', शेवटच्या बेंचवर बसायचो

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 3:57 PM

अभ्यासात ढ असल्याने वर्गात शिक्षकांचा ओरडा खाणारे आपल्या आसपास अनेकजण असतील. पण मोठे झाल्यावर तशी कबुली कुणी देत नाही.

बंगळुरू - अभ्यासात ढ असल्याने वर्गात शिक्षकांचा ओरडा खाणारे आपल्या आसपास अनेकजण असतील. पण मोठे झाल्यावर तशी कबुली कुणी देत नाही. मात्र कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी याला अपवाद ठरले आहेत. शाळेत असताना मी ढ होतो. तसेच पहिल्या बेंचवर बसल्यावर शिक्षक प्रश्न विचारत त्यामुळे मी नेहमी मागच्या बेंचवर बसत असे, अशी कबुलीच कुमारस्वामी यांनी दिली. जयानगर येथील नॅशनल डिग्री कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमात कुमारस्वामी सहभागी झाले होते. याच कॉलेजमधून कुमारस्वामी यांनी विज्ञान विषयाची पदवी मिळवली होती. तब्बल 12 वर्षांनंतर कुमारस्वामी आपल्या कॉलेजमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी आपले शालेय जीवनातील अनुभव कथन केले. ते म्हणाले, "विद्यार्थीदशेत असताना मी डॉ. राज कुमार यांचा चाहता होते. तसेच त्यांचे चित्रपट न चुकता पाहायचो. जर मी चांगला विद्यार्थी असतो तर आज आएएस अधिकारी बनलो असतो. पण प्रत्यक्षात वेगळंच घडलं." अशा वागण्यामुळे शालेय जीवनात वडिलांकडून ओरडा खावा लागत होता, अशीही कबुली त्यांनी दिली. "लहानपणी मला वडिलांकडून नेहमीच ओरडा खावा लागत असे. ते मला बिनकामाचा माणूस म्हणत. तसेच मी जीवनात काहीच करू शकत नाही, असेही सांगत. पण मी राजकारणात आलो. पहिल्यांदाच निवडणूक लढवून खासदार झालो. मेहनत घेतल्यानेच मी यशस्वी झालो.  तरी मी स्वत:ला एक भाग्यवान राजकारणी समजतो."  असे त्यांनी सांगितले. शालेय जीवनात मी निष्काळजीपणे वागलो. पण आजच्या विद्यार्थ्यांनी असे वागून चालणार नाही. त्यांनी जबाबदारपणे वागले पाहिजे. तसेच मला भेटण्यासाठी विद्यार्थ्यांनी परवानगी घेण्याची गरज नाही. त्यांनी विधानसौधामध्ये येऊन कधीही मला भेटावे," असेही कुमारस्वामी यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.  

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकSchoolशाळाStudentविद्यार्थी