शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

Karnataka Bypolls: कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपचा १२ जागांवर विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2019 05:59 IST

पोटनिवडणुकांंमध्ये भाजपचे सहापेक्षा कमी आमदार निवडून आले असते तर येडीयुरप्पा सरकार बहुमताच्या अभावी कोसळले असते.

बंगळुरू : कर्नाटकमधील बंडखोर आमदारांवर केलेल्या कारवाईनंतर १५ विधानसभा जागांवर घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकांत भाजपने १२ जागा जिंकून दणदणीत विजय मिळविला आहे.

मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या सरकारला बहुमतासाठी सहा जागांसाठी आवश्यकता असताना त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकल्याने आता हे सरकार स्थिर झाले आहे. काँग्रेसने फक्त दोन जागा जिंकल्या असून जनता दल (एस)ला एकाही जागेवर विजयी पताका फडकाविता आलेली नाही. या पोटनिवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले असून त्यात एक अपक्ष उमेदवारही विजयी झाला आहे. २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेमध्ये येडीयुरप्पा सरकारला याआधी भाजपचे १०५ व एक अपक्ष आमदार अशा १०६ लोकांचा पाठिंबा होता.

पोटनिवडणुकांंमध्ये भाजपचे सहापेक्षा कमी आमदार निवडून आले असते तर येडीयुरप्पा सरकार बहुमताच्या अभावी कोसळले असते. या पोटनिवडणुकांमध्ये वोक्कलिग समाजाला आपल्या बाजूला वळविण्यास भाजप यशस्वी ठरला. इतर मतदारसंघांमध्येही भाजपने काँग्रेसला धुळ चारली आहे.

म्हैसूर प्रांतामध्ये चांगला जनाधार असलेल्या जनता दल (एस) या पक्षाचा यशवंतपूर येथील उमेदवार तसेच या पक्षाने होस्कोटे या मतदारसंघात पाठिंबा दिलेला अपक्ष उमेदवार हे पराभूत झाले आहेत. झारखंडमध्ये पंतप्रधान मोदी यांनी, जनादेशाचा अपमान करून मागच्या दाराने चोरांप्रमाणे कर्नाटकमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या काँग्रेसला पोटनिवडणुकांत जनतेने चांगलीच अद्दल घडविली आहे, असा टोला लगावला.तर कर्नाटकमध्ये भाजप विकासाभिमुख व स्थिर सरकार देईल असे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे.

सिद्धरामय्या म्हणाले, काँग्रेसला पराभव मान्य पोटनिवडणुकांमध्ये जनतेने काँग्रेसचा केलेला पराभव आम्ही स्वीकारतो असे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी म्हटले आहे.लोकशाहीचा आम्ही आदर करतो असेही ते म्हणाले. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेता या पदाचा राजीनामा सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस