Karnataka BJP MLA: कर्नाटकातील गडग जिल्ह्यात लोकायुक्त पोलिसांनी शिरहट्टी विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार चंद्रू लामाणी यांना ₹५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इरिगेशन विभागातील काम मंजूर करून देण्यासाठी त्यांनी एकूण ₹११ लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात आमदारांचे दोन खासगी सहाय्यक मंजूनाथ वाल्मीकि आणि गुरुनायक यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
ट्रॅप ऑपरेशनमध्ये रंगेहात पकडले
लोकायुक्तच्या माहितीनुसार, गुत्तेदाराकडून लाच स्वीकारत असताना पूर्वनियोजित ट्रॅप ऑपरेशन राबवून आमदारांना रंगेहात पकडण्यात आले. अटकेनंतर आमदारांची पुढील चौकशी सुरू असून प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
कोणी केली तक्रार?
या प्रकरणातील तक्रार गडग जिल्ह्यातील चिंचली येथील रहिवासी आणि इरिगेशन विभागाचे क्लास-1 गुत्तेदार विजय पुजारी यांनी दाखल केली होती. तक्रारीत आमदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काम मंजूर करून देण्याच्या बदल्यात लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे.
₹११ लाखांची मागणी, ₹५ लाख घेताना अटक
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले की, रस्त्याच्या कडेला रिटेनिंग वॉल बांधकाम मंजूर करण्यासाठी आमदारांनी गुत्तेदाराकडून ₹११ लाखांची लाच मागितली होती. यापैकी ₹५ लाखांची आगाऊ रक्कम स्वीकारताना लोकायुक्त पथकाने सापळा रचून कारवाई केली. कारवाईदरम्यान संबंधित पुरावेही जप्त करण्यात आले.
भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा
या प्रकरणात आमदारांचे खासगी सहाय्यक (PA) मंजूनाथ वाल्मीकि आणि गुरुनायक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तिघांचीही कसून चौकशी सुरू असून प्रकरणातील सर्व बाबींची तपासणी केली जात आहे. लोकायुक्त पोलिसांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लोकायुक्तच्या अधिकृत निवेदनानुसार, लाच मागणी व स्वीकार यासंबंधी सर्व पुरावे तपासले जात आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
Web Summary : Karnataka BJP MLA Chandru Lamani was arrested for accepting a ₹5 lakh bribe to approve irrigation work. His two assistants were also detained in the Lokayukta trap. He demanded ₹11 lakh. A contractor filed the complaint, leading to the arrest and investigation.
Web Summary : कर्नाटक में बीजेपी विधायक चंद्रू लमानी को सिंचाई कार्य के लिए ₹5 लाख की रिश्वत लेते गिरफ्तार किया गया। लोकायुक्त के जाल में उनके दो सहायक भी पकड़े गए। उन्होंने ₹11 लाख की मांग की थी। ठेकेदार की शिकायत पर गिरफ्तारी हुई, जाँच जारी है।