शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

'ऑपरेशन लोटस' पुन्हा फेल; सात महिन्यात दोनदा बिघडला भाजपाचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2019 12:40 IST

अपयश आल्यानं भाजपाकडून ऑपरेशन लोटस स्थगित

बंगळुरु: कर्नाटकमधीलकाँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्याच्या भाजपाच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा धक्का बसला. ऐन मोक्याच्या वेळी काँग्रेस आमदारांनी पक्ष सोडण्यास नकार दिल्यानं भाजपाचं ऑपरेशन लोटस अयशस्वी ठरलं. काँग्रेस-जेडीएस सरकार उलथवण्याचा गेल्या सात महिन्यातला भाजपाचा हा दुसरा प्रयत्न होता. काँग्रेसच्या 12 ते 15 आमदारांना राजीनामे द्यायला लावण्याचा डाव भाजपानं आखला होता. मात्र भाजपाचा हा डाव फसला.भाजपानं गेल्या काही दिवसांपासून आपल्या आमदारांना हरयाणातल्या गुरुग्राममधील एका रिसॉर्टमध्ये ठेवलं होतं. याशिवाय काँग्रेसच्या चार आमदारांना मुंबईत ठेवण्यात आलं होतं. मात्र सरकार पाडण्यासाठी जितक्या आमदारांची आवश्यकता आहे, तितके आमदार राजीनामा देण्यास तयार नसल्याची जाणीव भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांना झाली. त्यानंतर त्यांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या आमदारांना ऑपरेशन लोटस स्थगित करत असल्याची माहिती दिली. 'एकाच वेळी काँग्रेस, जेडीएसच्या कमीत कमी 16 आमदारांनी राजीनामे द्यायला हवेत, असं पक्ष नेतृत्त्वानं म्हटलं होतं. त्यानुसार शनिवारपर्यंत काँग्रेसच्या 12 आमदारांनी पक्ष सोडण्याची तयारी दर्शवली होती. मात्र अखेरच्या क्षणी त्यांनी पक्ष सोडण्यास नकार दिला,' असं येडियुरप्पा यांनी हॉटेलमध्ये असलेल्या भाजपाच्या आमदारांना सांगितल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं दिलं आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सिद्धारामय्या यांनी उद्या आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला गैरहजर राहणाऱ्या आमदारांविरोधात पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.  

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस