शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Karnataka Assembly Elections: भाजपची 'बेळगाव'मधील उमेदवारांची पहिली यादी जाहीर, आमदार अनिल बेनकेंचा पत्ता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2023 16:30 IST

बेळगाव : भाजपची बेळगाव जिल्ह्यातील उमेदवार यादी जाहीर झाली असून बेळगाव उत्तर, खानापूर, ग्रामीण, हुक्केरी आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी ...

बेळगाव : भाजपची बेळगाव जिल्ह्यातील उमेदवार यादी जाहीर झाली असून बेळगाव उत्तर, खानापूर, ग्रामीण, हुक्केरी आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार जाहीर केले आहेत. या उमेदवार यादीत सर्वाधिक आश्चर्यचकित करणारी गोष्ट घडली असून, विद्यमान आमदार अनिल बेनके यांना डावलून डॉ. रवी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.खानापूर मतदारसंघातून विठ्ठल हलगेकर, दक्षिणमधून अभय पाटील, हुक्केरीमधून निखिल कत्ती, ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर आणि अथणीमधून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.बेळगाव उत्तर मतदारसंघात लिंगायत समाजाने अलीकडेच लिंगायत उमेदवार जाहीर केल्यास आपल्या सर्व संघटनांचा पाठिंबा देण्यात येईल, असे जाहीर केले होते. यामुळे हीच बाब हेरून भाजपने उत्तरमध्ये लिंगायत समाजातील डॉ. रवी पाटील यांना संधी दिली आहे, तर कर्नाटकातील राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावणारे माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केलेल्या आग्रहामुळे अथणी, कागवाड आणि ग्रामीण मतदारसंघात जारकीहोळी समर्थकांना संधी देण्यात आली आहे. ग्रामीणमधून नागेश मन्नोळकर, अथणीमधून महेश कुमठळ्ळी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. दक्षिण मतदारसंघात विद्यमान आमदारांची असलेली पकड लक्षात घेत पुन्हा अभय पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली असून, खानापूरमध्ये गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या कार्यक्रमांची यादी लक्षात घेत विठ्ठल हलगेकर यांना संधी देण्यात आली आहे. मात्र, या निवडणुकीत उमेदवारी मिळेल या आशेने भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार अरविंद पाटील यांना मात्र उमेदवारी नाकारली आहे. हुक्केरी मतदारसंघातून दिवंगत मंत्री उमेश कत्ती यांचे पुतणे निखिल कत्ती यांना संधी देण्यात आली असून, भाजपने या मतदारसंघात घराणेशाही जपत उमेदवारी जाहीर केल्याचे निदर्शनात येत आहे. याचबरोबर निपाणी मतदारसंघात शशिकला जोल्ले, चिकोडी मतदारसंघातून रमेश कत्ती यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

अशी आहे बेळगाव जिल्ह्यातील उमेदवारांची यादीअथणी -महेश कुमटहळ्ळीनिपाणी - शशिकला जोल्लेचिकोडी - रमेश कत्तीकागवाड - श्रीमंत पाटीलकुडची - पी राजीवरायबाग - दुर्योधन ऐहोलेहुक्केरी - निखिल कत्तीगोकाक - रमेश जारकिहोळीअरभावी - भालचंद्र जारकिहोळीयमनकनमर्डी - बसवराज हुंद्रीबेळगाव उत्तर - डॉ. रवी पाटीलबेळगाव दक्षिण - अभय पाटीलबेळगाव ग्रामीण - नागेश मन्नोळकरखानापूर - विठ्ठल हल्गेकर

टॅग्स :Karnatakकर्नाटकvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकbelgaonबेळगाव