शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

Karnataka Assembly Election 2018: दोन जागांवर लढणारे सिद्धरामय्या यशस्वी होणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 17:36 IST

सिद्धरामय्या हे दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत खरे, पण दोन्ही ठिकाणी त्यांना प्रखर विरोधाचा सामना करावा लागणार आहे.

बेंगळुरु- आपण केवळ एकाच जागेवरुन लढू अशी घोषणा करणाऱ्या सिद्धरामय्या यांनी येत्या विधानसभेसाठी दोन जागांवरुन लढण्याचा निर्णय घेतला आहे. चामुंडेश्वरी आणि बदामी येथे दोन्ही ठिकाणी त्यांनी अर्ज भरले आहेत. या दोन्ही जागांवर आपण विजयी होऊ असा विश्वास त्यांना वाटत असला तरी भाजपा आणि जनता दल सेक्युलर त्यांना पराभूत करण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत आहेत. तसेच या दोन जागांवर प्रचार करावा लागत असल्याने आणि विरोधकांचा वाढता रेटा यामुळे सिद्धरामय्या यांना दोन्ही जागांकडे विशेष लक्ष द्यावे लागणार असे दिसते.

मुख्यमंत्री पदावरती असूनही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवणारे सिद्धरामय्या कर्नाटकातील पहिलेच मुख्यमंत्री आहेत. यापुर्वी माजी मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांनी 1985 व 1989 साली दोन मतदारसंघांतून निवडणूक लढवली होती. होळेनरसिंहपूर आणि सतनूर या दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरला होता. 1985 साली ते दोन्ही जागांवर विजयी झाले आणि 1989 साली दोन्ही जागांवर ते पराभूत झाले. मात्र दोन्ही वेळेस ते मुख्यमंत्री नव्हते.1999 ते 2004 असे स्थिर सरकार देणाऱ्या आणि चांगले प्रशासक म्हणवल्या जाणाऱ्या एस. एम. कृष्णा यांना 2004 साली मतदारसंघ बदलावा लागला होता. त्यांनी मद्दूरऐवजी चामराजपेटमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. यावेळेस जनता दल सेक्युलरचे नेते आणि त्या पक्षाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार एच.डी. कुमारस्वामीही दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. रमणगारा आणि चन्नपटट्ण अशा दोन मतदारसंघातून त्यांनी अर्ज भरलेले आहेत.  देवराज अर्स यांच्यानंतर सलग पाच वर्षे मुख्यमंत्रीपदावर राहाण्याची संधी सिद्धरामय्या यांना मिळाली तरिही त्यांनी दोन जागांवर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. सिद्धरामय्या यांनी आपल्या वरुणा मतदारसंघातून त्यांचा मुलगा यतींद्र याला संधी दिली आणि ते शेजारील चामुंडेश्वरी विधानसभा मतादरसंघात गेले आहेत. या मतदारसंघातून ते पाच वेळा निवडून गेले आणि दोन वेळा पराभूत झाले आहेत. 2006 साली त्यांनी येथून शेवटची निवडणूक लढविली होती. तेव्हा त्यांना फक्त 257 मते मिळाली होती. तसेच त्यांचे एकेकाळचे मित्र जीटी देवेगौडा जे वक्कलिंग समाजाची मते मिळवण्यासाठी मदत करायचे तसेच श्रीनिवास प्रसाद दलित मतासांठी मदत करायचे ते आता त्यांच्यापासून दूर गेले आहेत. बदामीमध्ये सिद्धरामय्या यांच्या कुरुबा समाजाची मते असली तरी लिंगायत आणि नायक समाजाची तेथे जवळपास 50 टक्के मते आहेत. त्यामुळे भाजपाने त्यांच्याविरोधात नायक समाजाचे श्रीरामलू यांना उभे केले आहे. कर्नाटकामध्ये कॉंँग्रेस पुन्हा स्वबळावर सत्तेत आली तर सिद्धरामय्या यांचे पक्षांतर्गत वजन चांगलेच वाढणार आहे. तसेच या दोन्ही जागांवर त्यांना यश आले तरीही तो त्यांचा मोठा विजय मानण्यात येईल, मात्र दोन्ही ठिकाणी ते पराभूत झाले तर मात्र भाजपा, जनता दल सेक्युलर त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडणार नाही.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेसJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)Electionनिवडणूकsiddaramaiahसिद्धरामय्या