शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra-Karnataka Border Dispute: "महाराष्ट्र सरकारने 'तो' निर्णय मागे घ्यावा, अन्यथा..."; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 17:06 IST

Maharashtra-Karnataka Border Dispute : महाराष्ट्र सरकारने कर्नाटकातील मराठी भाषिकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Maharashtra-Karnataka : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातला सीमावाद गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने आरोग्य योजनांचा लाभ शेजारच्या राज्यातील मराठी भाषिक गावांपर्यंत पोहोचवण्यासाठी पावले उचलली आहेत. यावरुन आता कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बुधवारी (5 एप्रिल) इशारा दिला आहे. 

बोम्मईंचा आरोपमहाराष्ट्र सरकारने आपल्या आरोग्य सेवा योजनेचा लाभ कर्नाटकातील 865 गावांपर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले, 'मी महाराष्ट्र सरकारला हा निर्णय मागे घेण्याचे आवाहन करतो. निर्णय मागे न घेतल्यास आम्हीही अशाच प्रकारचा निर्णय घेऊ,' असे बोम्मई म्हणाले. याशिवाय, 'कर्नाटकातील सीमावर्ती गावांतील लोकांना विमा देण्याच्या नावाखाली महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अंतर्गत येत असल्याचे घोषणापत्र घेत आहे,' असा आरोपही त्यांनी केलाय.

आम्हीही तेच करूबोम्मई पुढे म्हणाले की, 'कर्नाटक-महाराष्ट्र सीमा वाद सुप्रीम कोर्टात आहे, पण महाराष्ट्र सरकार दोन्ही राज्यांच्या सीमा भागात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करत आहे. कर्नाटक सीमेवरील लोकांना विमा योजनेचा लाभ देण्याचा आदेश योग्य नाही. दोन्ही राज्यांमधील संबंध बिघडवण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्र सरकारचे हे वर्तन असेच सुरू राहिल्यास महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या कन्नड लोकांच्या संरक्षणासाठी कर्नाटक सरकारही अशीच विमा योजना राबवेल.'

काँग्रेस काय म्हणाली?विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, 'महाराष्ट्राचा निर्णय योग्य नाही. त्यांनी तो तात्काळ मागे घेतला नाही तर त्याचा चांगला परिणाम होणार नाही.

काय प्रकरण आहे?महाराष्ट्राने सरकारने एक निर्णय घेतला आहे, त्यानुसार अंत्योदय अन्न योजनेचे लाभार्थी, प्राधान्य गटातील कुटुंबे (राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 अंतर्गत) आणि अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा लाभ घेऊ शकतात. बेळगावी, करवाड, कलबुर्गी आणि बिदर या 12 तालुक्यांतील 865 गावांचा महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcongressकाँग्रेस