शेणानं तन-मन पवित्र होतं! फायदे सांगता सांगता डॉक्टरांनी शेण खाल्लं; व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 15:30 IST2021-11-17T15:27:20+5:302021-11-17T15:30:17+5:30
गायीचं शेण खाल्ल्यानं आत्मा पवित्र होत असल्याचा, आजार दूर होत असल्याचा डॉक्टरांचा दावा

शेणानं तन-मन पवित्र होतं! फायदे सांगता सांगता डॉक्टरांनी शेण खाल्लं; व्हिडीओ व्हायरल
शेण खात असलेल्या एका डॉक्टरचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेणाचं महत्त्व सांगणाऱ्या या डॉक्टरांचं नाव मनोज मित्तल आहे. ते कर्नालचे रहिवासी आहेत. एमबीबीएस झालेले मनोज डॉक्टर गेल्या अनेक वर्षांपासून गोमूत्र पित आहेत आणि शेणही खात आहेत.
गायीच्या शेणामध्ये मोठ्या प्रमाणात व्हिटामीन बी असतं. त्यामुळे रेडिएशनपासून बचाव होतो, असा दावा मित्तल यांनी केला. मोबाईल, एसी, फ्रीज आणि अन्य इलेक्ट्रिक उपकरणांमधून रेडिशन निघतं. त्यामुळे कर्करोगासारखे आजार होतात. मात्र गायीचं शेण खाल्ल्यानं रेडिएशनचा परिणाम कमी करता येऊ शकतो, असं मित्तल यांनी सांगितलं.
Dr. Manoj Mittal MBBS MD's prescription. Via @ColdCigarpic.twitter.com/SW2oz5ao0vhttps://t.co/Gzww80KiSs
— Rofl Gandhi 2.0 🚜🏹 (@RoflGandhi_) November 16, 2021
गर्भवतीनं प्रसुतीदरम्यान गायीचं शेण खाल्ल्यास प्रसुतीवेळी फारसा त्रास होत नाही. शेण खाल्ल्यामुळे अनेक आजार बरे होतात, असा दावा मित्तल यांनी केला. मनोज मित्तल बालरोगतज्ज्ञ असून कर्नालमध्ये त्यांचं मोठं रुग्णालय आहे. आपण कायम जमिनीवर झोपतो आणि एसीचा वापर करत नाही, असं मित्तल सांगतात. गायीच्या शेणात २८ टक्के ऑक्सिजन असतो. त्यामुळे आरोग्य चांगलं राहतं, असा त्यांचा दावा आहे.
मनोज मित्तल यांचा व्हिडीओ व्हायरल होताच विविध प्रकारच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींनी मनोज यांच्या पदवीवर शंका उपस्थित केली. तर काहींनी मनोज यांचा दावा खरा वाटत आहे. सोशल मीडियावर मित्तल यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.