शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Kapil Sibal: कपिल सिब्बल आहेत अब्जावधींच्या संपत्तीचे धनी, कारचे शौकीन, एवढी आहे एकूण मालमत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 18:37 IST

Kapil Sibal News: ज्येष्ठ विधिज्ञ आणि राजकारणी कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना सपाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. देशाचे माजी कायदेमंत्री असलेले कपिल सिब्बल हे कारचे शौकीन आहेत. तसेच अब्जावधीच्या संपत्तीचे मालक आहेत.

नवी दिल्ली - ज्येष्ठ विधिज्ञ आणि राजकारणीकपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत समाजवादी पक्षामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना सपाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. देशाचे माजी कायदेमंत्री असलेले कपिल सिब्बल हे कारचे शौकीन आहेत. तसेच अब्जावधीच्या संपत्तीचे मालक आहेत. त्यांच्याकडे किती कार आहेत. त्यांच्याकडे कुठल्या कुठल्या कारचं कलेक्शन आहे आणि त्यांची एकूण किती संपत्ती आहे, याचा आढावा पुढीलप्रमाणे.

२०१६ मध्ये राज्यसभा निवडणुकीत दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कपिल सिब्बल यांच्याकडे एकीण ८९.४८ लाख रुपयांच्या गाड्या आहेत. यामध्ये १९९५ मधील एक सुझुकी जीप, २००१ मधील ह्युंडाई सोनाटा, २००३ मधील टोयोटा,  २०१२ मधील मारुती डिझायर आणि २०१५ मधील मर्सिडिझ जीएलसी आणि २०१६ मधील टोयोटा Camry यांचा समावेश आहे. त्याशिवाय त्यांच्याकडे १९९७ मधील रॉयल एन्फिल्ड बुलेट आणि २०१६ मधील हीरो स्पेंडर यांचा समावेश आहे.

याशिवाय कपिल सिब्बल यांच्याकडे देशातील विविध शहरांमध्ये कोट्यवधीची मालमत्ता आहे. लुधियाना, चंडीगड, दिल्ली, बंगळुरू या शहरांमध्ये त्यांच्याकडे ३.६५ कोटी रुपयांची कमर्शियल मालमत्ता आहे. तर सिकंदराबाद, पाटणा, दिल्ली, चंडीगड, गुरुग्राम आणि हैदराबाद येथे ९९.५९ कोटी रुपयांची रहिवासी मालमत्ता आहे.

तसेच कपिल सिब्बल यांनी शेअर बाजारात १० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. कपिल सिब्बल हे १०० कोटी रुपयांहून अधिकची मालमत्ता असलेल्या मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. २०१६ मधील प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण २१२ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पैकी १४ कोटी रुपये बँकेत आहेत. तर त्यांच्याकडे ३ लाख रुपये रोख रक्कम आहे. 

टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बलPoliticsराजकारणSamajwadi Partyसमाजवादी पार्टीcongressकाँग्रेस