दिल्ली सरकारमधील कॅबिनेट मंत्री कपिल मिश्रा यांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. मद्य घोटाळा प्रकरणी अद्याप उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून हे प्रकरण पूर्णपणे संपलेलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. अरविंद केजरीवाल फक्त 'ओव्हरअॅक्टिंग' करत असल्याचा आरोप मिश्रा यांनी केला. तसेच केजरीवाल जेव्हा सरकारमध्ये होते तेव्हाही जनतेची दिशाभूल करत होते आणि आजही तेच करत आहेत. दिल्लीची जनता ११ वर्षे त्रस्त असून आता सत्य सर्वांसमोर आलं आहे असंही ते म्हणाले.
"मद्य घोटाळा प्रकरणात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय या दोघांनीही महत्त्वाची माहिती दिली आहे. असं असूनही केजरीवाल स्वतःला निर्दोष सांगत आहेत. जर मद्य धोरण योग्य होतं, तर तक्रार होताच ते मागे का घेण्यात आलं?" चौकशी सुरू होताच अनेक मोबाईल तोडण्यात आले, असा गंभीर आरोपही मिश्रा यांनी केला.
कपिल मिश्रा पुढे म्हणाले की, "घाऊक व्यापाऱ्यांचं कमिशन ५ टक्क्यांवरून वाढवून १२ टक्के करण्यात आलं होतं." त्यांनी सीएजी रिपोर्टचा हवाला देत महसूल नुकसानीचा मुद्दाही उपस्थित केला. मात्र आम आदमी पक्षाने हे सर्व आरोप फेटाळून लावत कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचा दावा आधीच केला आहे.
जनतेचं न्यायालय सर्वात मोठं - कपिल मिश्रा
पत्रकार परिषदेत मिश्रा यांनी दिल्लीतील रस्ते, पाणी, सांडपाणी, शाळा, रुग्णालय आणि यमुना नदीच्या स्वच्छतेचा मुद्दा उपस्थित केला. ११ वर्षांत परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिक बिघडली आहे. जनतेचं न्यायालय हे सर्वात मोठं असतं आणि दिल्लीच्या जनतेने निवडणुकीत त्याचं उत्तर दिलं आहे असंही त्यांनी नमूद केलं.
मागील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला होता, ज्यामध्ये अनेक मोठ्या नेत्यांचा पराभव झाला. आता हे प्रकरण दिल्ली उच्च न्यायालयात पोहोचलं असून न्यायालयाचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरेल. जाणकारांच्या मते, हा मुद्दा आगामी निवडणुकांमध्ये, विशेषतः दिल्ली, गुजरात आणि पंजाबच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर गाजण्याची शक्यता आहे.
Web Summary : Kapil Mishra accuses Arvind Kejriwal of 'overacting' and misleading the public regarding the liquor scam case. He alleges corruption in the policy, questioning its withdrawal and destruction of evidence. Mishra highlights failures in Delhi's infrastructure and blames Kejriwal for the city's deteriorated state over the past 11 years.
Web Summary : कपिल मिश्रा ने अरविंद केजरीवाल पर 'ओवरएक्टिंग' करने और शराब घोटाले मामले में जनता को गुमराह करने का आरोप लगाया। उन्होंने नीति में भ्रष्टाचार का आरोप लगाया, इसकी वापसी और सबूतों के विनाश पर सवाल उठाया। मिश्रा ने दिल्ली के बुनियादी ढांचे में विफलताओं को उजागर किया और पिछले 11 वर्षों में शहर की बिगड़ी हालत के लिए केजरीवाल को दोषी ठहराया।