शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Kanpur Violence: कानपूर हिंसाचारात नवीन खुलासा; अवैध इमारतींमधून दगडफेक, देशी बॉम्ब आणि 141 व्हॉट्सअॅप ग्रुप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 11:52 IST

Kanpur Violence: कानपूर हिंसाचारप्रकरणी 36 जणांची ओळख पटली असून, मुख्य सूत्रधार जफर हयात हाश्मी याच्यासह 29 जणांना अटक केली आहे.

Kanpur Violence:उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये हिंसाचारप्रकरणी सरकार अॅक्शन मोडमध्ये आले आहे. या हिंसाचाराचा सूत्रधार आणि मौलाना मोहम्मद अली जोहर फॅन्स असोसिएशनचा प्रमुख जफर हयात हाश्मीच्या मोबाईलमधून नवनवीन गुपिते उघड होत आहेत. त्याच्या मोबाईलमध्ये एकूण 141 व्हॉट्सअॅप ग्रुप सापडले आहेत. जवळपास सर्वच गटात बाजार बंद आणि हिंसाचार झाल्याची चर्चा आहे. हिंसाचाराच्या दिवसाचे प्रत्येक क्षणाचे अपडेट त्याच्या ग्रुपमध्ये दिले जात होते. कोणी व्हिडिओ पोस्ट करत होते तर कोणी फोटो आणि मेसेज पाठवत होते. आता पोलिसांनी पुरावा म्हणून या चॅटचा तपासात समावेश केला आहे.

मोबाईलमधून अनेक खुलासे पोलिसांनी हयात आणि इतर आरोपींचे मोबाईल जप्त केले होते. हयातच्या मोबाईलमध्ये मुस्लिम संघटनांचे व्हॉट्सअॅप ग्रुप सापडले आहेत. हिंसाचाराच्या दिवशी सकाळपासूनच जवळपास प्रत्येक ग्रुप सक्रिय होता. MMA जोहर फॅन्स असोसिएशन कानपूर टीम नावाच्या ग्रुपमध्ये बहुतेक संभाषणे आणि अपडेट्स केले जात होते. बाजार बंदबाबत गटाची आपापसात चर्चा झाली. सर्व बातम्यांचे कटिंग्सही सापडले. विशेष म्हणजे, आंदोलन मागे घेण्याचे हाश्मीचे वक्तव्य पोलिसांना चकमा देण्यासाठी होते. तो सतत लोकांना भडकावण्यात गुंतला होता आणि त्याची पत्नीही यात सहभागी होती. त्याच्या अनेक व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरील चॅट्समधून याचा खुलासा झाला आहे.

देशी बॉम्ब रस्त्याच्या कडेला आढळलेया प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा असा झाला आहे की, हिंसाचाराच्या वेळी उंच इमारतींवरून दगडफेक करण्यात आली होती. नवीन रस्ता आणि बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेली उच्चभ्रू इमारत सुरक्षेसाठी मोठा धोका होत्या. आता पोलिस सहआयुक्तांनी कानपूर विकास प्राधिकरणाला चौकशी आणि कारवाईसाठी पत्र पाठवले आहे. जाजमाळ, बाबूपुरवा, गडारियन पूर्वेसह इतर अनेक भागातूनही गोंधळ घालणारे लोक आल्याचे समोर आले आहे. नवीन रस्त्याच्या आजूबाजूच्या मशिदींमध्ये नमाज अदा करण्याचे आदेश त्यांना मिळाले होते. नमाजानंतर कापड ओवाळताच दगडफेक व्हायची. हाताने बनवलेले देशी बॉम्ब रस्त्याच्या कडेला पडलेले आढळले आहेत.

मास्टरमाइंडसह 29 जणांना अटक

कानपूर हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 36 गुन्हेगारांची ओळख पटवली आहे. कानपूर हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार जफर हयात हाश्मी, जावेद अहमद खान, मोहम्मद राहिल आणि मोहम्मद सुफियान अहमसह पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना अटक केली आहे. तर सपा नेत्याचे नाव यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार जफर हयात हाश्मी याने चौकशीत सांगितले आहे की, देशाला संदेश देता यावा म्हणून 3 जून ही तारीख जाणूनबुजून निश्चित करण्यात आली होती. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशkanpur-urban-pcकानपूर शहरीPoliceपोलिस