संतापजनक! नाल्याच्या पाण्यात मळतोय चपातीचं पीठ; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 14:14 IST2025-03-01T14:14:08+5:302025-03-01T14:14:49+5:30
एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ढाब्याचा कर्मचारी घाणेरड्या नाल्याच्या पाण्याने पीठ मळत असल्याचं दिसून येतं.

संतापजनक! नाल्याच्या पाण्यात मळतोय चपातीचं पीठ; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
उत्तर प्रदेशातील कानपूर येथील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ढाब्याचा कर्मचारी घाणेरड्या नाल्याच्या पाण्याने पीठ मळत असल्याचं दिसून येतं. यानंतर, या पिठापासून चपाती बनवल्या जातात आणि ग्राहकांना दिल्या जातात. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, सचेंडी पोलीस ठाण्यात तैनात असलेल्या उपनिरीक्षकाने ढाबा मालक आणि कर्मचाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
ढाब्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. ज्यामध्ये एक कर्मचारी हातात असलेल्या भांड्यात पीठ मळत होता. पीठ मळताना तो नाल्याचं पाणी मिसळत होता. यानंतर, तो त्याच पिठापासून चपाती बनवत होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाईला आता सुरुवात केली आहे. राम बहादूरचा सागर ढाबा मशेंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भौती महामार्गावर आहे.
सागर शुद्ध शाकाहारी ढाबा & रेस्टोरेंट, कानपुर में नाले वाले पानी के गुंदे हुए आटे की रोटी परोसी जाती है।
— Abid Sheikh (@imabidsheikh1) February 28, 2025
लेकिन न यहां किसी का धर्म भ्रष्ट होगा और न ही किसी को #Hygiene की फिक्र!
कोई बता सकता है क्यों? #Kanpur#UnhygienicFoodpic.twitter.com/FNNErzqL6W
सचेंडी पोलीस ठाण्यात तैनात असलेले एसआय अजित कुमार सिंह यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला. त्यांनी सांगितलं की, ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे. अन्न खाणाऱ्या लोकांमध्ये यामुळे विविध आजारांचा संसर्ग होऊ शकतो. या प्रकरणी ढाबा मालक राम बहादूर आणि कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कर्मचारी मूळगंजचा रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे.
नमुने प्रयोगशाळेत पाठवले
ढाबा मालकाचे म्हणणं आहे की, त्या कर्मचाऱ्याला फक्त एका दिवसासाठी कामावर ठेवण्यात आलं होतं. घाणेरड्या पाण्याने पीठ मळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये ढाब्याविरुद्ध संताप आहे. दूषित पाणी शरीरात गेल्याने अतिसार, उलट्या, पोटदुखी होऊ शकते. गुरुवारी, अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या पथकाने नमुने घेतले आणि ते चाचणीसाठी पाठवले.