सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 16:45 IST2025-08-03T16:45:01+5:302025-08-03T16:45:39+5:30

कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या.

kanpur girl elopes with aunts sister in law after facing family opposition to their relationship | सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं

सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं

उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मुली एकमेकींच्या प्रेमात पडल्या. कुटुंबातील सदस्यांना याची माहिती मिळताच त्यांनी मुलींना भेटण्यास बंदी घातली. मात्र दोन्ही मुलींनी एकत्र जगण्याची शपथ घेतली. संधी मिळताच दोघीही सर्व बंधनं तोडून पळून गेल्या. गेल्या पाच वर्षांपासून दोघींमध्ये जवळीक होती. एका मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी दोघींनाही आक्षेपार्ह परिस्थितीत पकडलं. त्यानंतर त्यांनी त्यांना भेटण्यास बंदी घातली.

जाजमऊ गल्ला गोडाउन परिसरात राहणारी एक मुलगी तिच्या मावशीच्या नणंदेच्या प्रेमात पडली. कुटुंबातील सदस्यांच्या मते, दोघींमध्ये पाच वर्षांपासून जवळीक होती. मावशीची नणंद असल्याने ती नेहमीच घरी येत असे. दोघीही बरेच दिवस एकत्र राहत होत्या. दोघीही बंद खोलीत अनेक तास बोलत असायच्या. एके दिवशी जेव्हा कुटुंबातील सदस्य अचानक खोलीत पोहोचले तेव्हा त्या आक्षेपार्ह अवस्थेत आढळल्या. 

दोन्ही मुलींमुळे घरात यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं. १८ वर्षीय मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, शुक्रवारी संध्याकाळी सर्वजण आपापल्या कामात व्यस्त होते. याच दरम्यान, ती घरातून बेपत्ता झाली. ते मुलीचा सतत शोध घेत आहेत. परंतु ती कुठेही सापडली नाही. त्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी दुसऱ्या मुलीच्या घरी चौकशी केली असता, ती देखील घरातून बेपत्ता असल्याचं आढळून आलं. 

जाजमऊ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तक्रार दाखल करणाऱ्या मुलीच्या मोठ्या बहिणीने सांगितलं, की तिची बहीण घरीच असायची. तर दुसरी मुलगी एका कारखान्यात काम करायची. कारखाना जवळ असल्याचं सांगून ती अनेकदा राहायची. गेल्या आठवड्यात ती सुमारे चार-पाच दिवस राहिली होती. याच दरम्यान, कुटुंबातील सदस्यांनी दोघींनाही रंगेहाथ पकडलं.

Web Title: kanpur girl elopes with aunts sister in law after facing family opposition to their relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.