शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
3
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
4
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
5
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
6
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
7
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
9
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
10
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
11
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
12
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
13
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
14
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
15
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
16
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
17
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
18
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
19
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
20
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 

मोदींची स्तुती अन् पाकिस्तानचं कौतुक, नेटीझन्सने कंगनाला फैलावर घेतलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 1:49 PM

कंगना आणि ट्विटर वाद हे जणू समीकरण बनलं आहे. कंगना प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करत लाईमलाईटचा विषय बनते. सध्या पाकिस्तान स्टँड विथ इंडिया हा ट्विटर ट्रेंड आहे.

ठळक मुद्देकंगना आणि ट्विटर वाद हे जणू समीकरण बनलं आहे. कंगना प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करत लाईमलाईटचा विषय बनते. सध्या पाकिस्तान स्टँड विथ इंडिया हा ट्विटर ट्रेंड आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत  (Kangana Ranaut) तिच्या बयानबजीमुळे सतत चर्चेत असते. मुद्दा कुठलाही असो कंगना बोलणार म्हणजे बोलणार. महाराष्ट्राला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिल्यानंतर कंगनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्यानंतर, कंगना आणि शिवसेना वाद चांगलाच रंगला. आता, कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत, पाकिस्तानचीही स्तुती केलीय. त्यानंतर, नेटीझन्सने कंगनाला फैलावर घेतलं आहे. 

कंगना आणि ट्विटर वाद हे जणू समीकरण बनलं आहे. कंगना प्रत्येक मुद्द्यावर ट्विट करत लाईमलाईटचा विषय बनते. सध्या पाकिस्तान स्टँड विथ इंडिया हा ट्विटर ट्रेंड आहे. देशातील कोरोना परिस्थितीवर पाकिस्तानने चिंता व्यक्त करत, भारताच्या मदतीसाठी तयार असल्याचं म्हटलंय. त्यानंतर, कंगनाने ट्विट करुन पाकिस्तानमधील या ट्रेंडचा आदर असल्याच म्हटलं आहे. 

“पाकिस्तानात चाललेला टॉप ट्रेंड पाहून फार छान वाटलं.#PakistanStandsWithIndia... भारताचे वीर पुरूष मोदींनी दिलेल्या लसीचे त्यांनी कौतुक केले, या कठीण काळात आम्ही त्यांच्या सहानुभूतीचा आदर करतो.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनानं पाकिस्तानचं कौतुक केलंय. मात्र, तिचं हे कौतुक काही भारतीय नेटकऱ्यांना आवडलं नाही.  तुझं डोकं ठिकाणावर आहे का? असे म्हणत नेटीझन्सने कंगनाला फैलावर घेतलं आहे. 

तापसी पन्नूवर केली टीका

कंगनाने एका ट्विटला रिप्लाय देताना हे ट्विट केले.  अर्बन डिक्शनरी नामक ट्विटर पेजचा एक फोटो तिने शेअर केला. ‘तापसी पन्लू बॉलिवूड अभिनेत्री आहे. जी तिच्या परखड स्वभावासाठी ओळखली जाते. तिला कंगना राणौतची सस्ती कॉपी म्हटले जाते. ती पप्पू गँगची सदस्य आहे. तापसी पन्नूला कंगनाचे वॉलमार्ट व्हर्जनही म्हटले जाते,’ असे या पेजवर लिहिले होते. या पेजचा फोटो शेअर करत, कंगनानेही तापसीला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. ‘हा हा हा... शी-मॅन  आज खूप आनंदात असेन,’ असे तिने लिहिले.

नेटीझन्सने केलं ट्रोल

कंगनाने तापसीला ‘शी-मॅन’ म्हणणे लोकांना आवडले नाही. अनेकांनी यावरून कंगनाला फैलावर घेतले. अखेर लोकांचा हा संताप बघून कंगनाला स्पष्टीकरण द्यावे लागले. ‘शी-मॅन असणे चुकीचे आहे? तिला ही उपमा देऊन मी काय चूक केली. ही तर तिच्या खंबीर व्यक्तिमत्त्वाचे कौतुक आहे. तुम्ही नकारात्मक विचार का करता, मला कळत नाही,’अशा शब्दांत कंगनाने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतcorona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानNarendra Modiनरेंद्र मोदी