कंधार शहरी व ग्रामीण नागरिक तापीने बेजार

By Admin | Updated: May 6, 2014 20:57 IST2014-05-06T18:31:13+5:302014-05-06T20:57:21+5:30

कंधार : शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना ताप आजाराने भलतेच बेजार केले आहे़ शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्रातही रूग्ण उपचार घेतानाचे चित्र समोर आले आहे़

Kandahar urban and rural citizen Tapieni Bazar | कंधार शहरी व ग्रामीण नागरिक तापीने बेजार

कंधार शहरी व ग्रामीण नागरिक तापीने बेजार

कंधार : शहरात व ग्रामीण भागात नागरिकांना ताप आजाराने भलतेच बेजार केले आहे़ शहरातील ग्रामीण रुग्णालय आणि खाजगी रुग्णालयात रुग्णांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र असून ५ प्राथमिक आरोग्य केंद्रातही रूग्ण उपचार घेतानाचे चित्र समोर आले आहे़
गत दीड ते दोन महिन्यापासून हवामान व वातावरणात सतत बदल होत आहे़ उष्णता, गारवा, गारपीट, पावसाची हजेरी आदींमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे़ त्यामुळे सर्दी-ताप-खोकला आदीला सामोरे जाण्याचा प्रसंग नागरिकांवर ओढवला आहे़ ग्रामीण रुग्णालयात बा‘ रुग्ण विभागात उपचार घेणारे रुग्ण ४०० ते ५०० असतात़ त्यात गत काही दिवसांपासून तापीचे ३० ते ४० रुग्ण आहेत़ विशेष म्हणजे त्यातील ४ ते ५ जण टायफाईडचे असल्याचे सांगण्यात आले़ अंतररूग्ण विभागात दररोज १०-१५ रूग्ण दाखल होत आहेत़ रुग्णावर डॉ़संगीता भालेराव, डॉ़चंद्रकांत पाटील, डॉ़दत्तात्रय गुडमेवार, डॉ़बालाजी कागणे, डॉ़निकत फातेमा आदीजण उपचार करत आहेत़
शहरात होत असलेल्या मानार नदीतील पाणीपुरवठा दूषित आहे़ यापासून बचाव करण्यासाठी ऩप़ आता ध्वनीक्षेपाद्वारे पाणी उकळून, गाळून पिण्याचे आवाहन करत आहे़ ऩप़ लोकप्रतिनिधी आपल्या प्रभागात आता तरी जावून नागरिकांना दिलासा देतील का, गटातटाचे राजकारण बाजूला सारून शहरवासियांचे प्रश्न सोडतील का हा खरा प्रश्न आहे़ ऩप़मध्ये विकासावर बोलणारे, समस्यांना वाचा फोडणारे नगरसेवक आहेत की नाहीत, अशी चर्चा नागरिक करीत आहेत़ एखाद्या प्रश्नाचा निपटारा होण्यासाठी ऩप़वर निघणारे मोर्चेही होत नाहीत़ नागरिकही उदासिन झाले आहेत़
स्वच्छतेबद्दल ऩप़ जशी तत्पर आहे, तसेच शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी असावी, अशी भावना जनतेतून व्यक्त होत आहे़ रस्त्यावर उडणारा धुराळा उपहारगृहातील खाद्यपदार्थांवर जात आहे़ उघडे ठेवलेले अन्न व खाद्यपदार्थ सेवन करणे,दूषित पाणी पिणे आदीने नागरिक रोगाचा सामना करत आहेत़ शहरासोबतच ग्रामीण भागातही तापीचे रुग्ण असल्याचे समोर आले आहे़
१ ते ५ मे कालावधीत प्राथमिक आरोग्य कंेद्रात तापरूग्ण उपचारासाठ दाखल झाल्याची माहिती तालुका आरोग्यअधिकारी डॉ़ढवळे व अली यांनी दिली़ पानशेवडी प्रा़आ़केंद्रात-८, कुरूळा-५, उस्माननगर-१२, पेठवडज-२३ व बारूळ प्रा़आ़केंद्रात २५ रूग्ण वरील कालावधीत होते़ उपचारासाठी मुबलक औषधसाठा उपलब्ध असताना खाजगी रुग्णालयात दररोज १०० ते १५० रुग्ण कसे उपचार घेत आहेत हा एक मोठा प्रश्न आहे़

Web Title: Kandahar urban and rural citizen Tapieni Bazar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.