कामरसपल्लीच्या शेतकर्याची आत्महत्या
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:20+5:302015-02-14T23:52:20+5:30
शंकरनगर ता. बिलोली: दुष्काळी परिस्थिीती व कर्जामुळे कामरसपल्ली ता. बिलोली येथील एका शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली.

कामरसपल्लीच्या शेतकर्याची आत्महत्या
श करनगर ता. बिलोली: दुष्काळी परिस्थिीती व कर्जामुळे कामरसपल्ली ता. बिलोली येथील एका शेतकर्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी पहाटे घडली. कोंडीबा नागोराव वाघमोडे (वय ६६ ^^) असे मयत शेतकर्याचे नाव आहे. त्यांना पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. इंदिरा आवास योजनेतून त्यांना एक खोलीचे घर मिळाले होते. याच खोलीत आठ सदस्यांसह कोंडीबा वाघमोडे राहत होते. दीड लाख कर्ज काढून पाच वर्षांपूर्वी त्यांनी मुलीचे लग्न लावून दिले होते. अलीकडे ती माहेरी आली. तिचे कुंटुंब कल्याणचे ऑपरेशन झाले होते. दरम्यान, चार महिन्यापूर्वी स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखा रामतीर्थकडून कोंडीबा वाघमोडे यांनी २० हजारांचे कर्ज उचलले होते. नापीकी व कर्जबाजारीमुळे घर कसे चालवावे? या विमनस्क अवस्थेत ते होते. यातच १४ फेब्रुवारी रोजी पहाटे गावाबाहेरील राजेंद्र जहागीरदार यांच्या शेतातील चिंचेच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक व्यंकट भारती, गोविंद शिंदे, रामचंद्र पचलिंग, पचलिंग तपासे तपास करीत आहेत. दरम्यान, आ. सुभाष साबणे, बाबारा रोकडे यांनी घटनास्थळी भेट देवून मयताच्या कुंटुबियांचे सात्वंन केले व रोख १० हजारांची मदत केली. (वार्ताहर)