शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

'मोदीजी, तुमच्या पक्षातल्या एका तरी स्वातंत्र्य सैनिकाचं नाव सांगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2018 14:54 IST

काँग्रेसचं पंतप्रधान मोदींना आव्हान

भोपाळ: मध्य प्रदेशातील निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनीकाँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर हल्लाबोल केला. या टीकेला आता काँग्रेसनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 'मोदी वारंवार काँग्रेसवर टीका करतात. काँग्रेसनंच इंग्रजांविरोधात लढा दिला. देशासाठी लढा देणाऱ्या पक्षाला आता मोदी राष्ट्रवाद शिकवणार का?' असा सवाल काँग्रेस नेते कमलनाथ यांनी उपस्थित केला आहे. निवडणूक प्रचारातील भाषणांमधून काँग्रेसवर निशाणा साधणाऱ्या मोदींना काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. 'आधी पंतप्रधान मोदी रोजगार आणि शेतकऱ्यांबद्दल बोलायचे. मात्र आता ते जिथे जातात, तिथे राहुल गांधी आणि राष्ट्रवादाबद्दल बोलतात. मोदींना राहुल गांधींची इतकी चिंता कशासाठी? मोदी त्यांच्या छिंदवाडामधील सभेत जवळपास 30 मिनिटं राहुल गांधी आणि राष्ट्रवादाबद्दल बोलले. ज्या काँग्रेसनं इंग्रजांविरोधात लढा दिला, त्यांना आता मोदी राष्ट्रवादाचे धडे देणार का?,' असा सवाल कमलनाथ यांनी उपस्थित केला. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्या त्यांच्या पक्षातील एका तरी नेत्याचं नाव मोदींनी सांगावं, असं आव्हानदेखील त्यांनी दिलं. कमलनाथ यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनादेखील लक्ष्य केलं. 'मुख्यमंत्री स्वत:ला शेतकऱ्याचा पुत्र म्हणवून घेतात. मात्र राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत,' अशी टीका त्यांनी केली. मध्य प्रदेश आणि आफ्रिका खंडातील शेतकऱ्यांची परिस्थिती सारखीच असल्याचंही ते म्हणाले. राज्य सरकार औद्योगिक आघाडीवर पूर्णपणे अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसMadhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018