शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कल्याण मतदारसंघ : मनसे उतरल्यास लढत चुरशीची

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 05:38 IST

पुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला.

- प्रशांत मानेपुनर्रचनेत ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन कल्याण हा नवा मतदारसंघ तयार झाला. तेथील पहिल्या निवडणुकीत दिवंगत माजी खासदार प्रकाश परांजपे यांचे पुत्र आनंद शिवसेनेचे उमेदवार म्हणून विजयी झाले. शिवसेनेतील वागणुकीला कंटाळून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरल्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना शिवसेनेच्या डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पराभवाची धूळ चारली.सध्या सुरू असलेल्या चर्चेनुसार जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार हा हा मतदारसंघ त्या पक्षाने मनसेला दिला, तर सध्या शिवसेनेसाठी एकतर्फी वाटणारी निवडणूक कमालीची चुरशीची होऊ शकते. शिवसेना-भाजपा युती होईल, हे गृहीत धरून भाजपाने तेथे उमेदवार ठरवलेला नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार नाही. राष्ट्रवादीतर्फे आनंद परांजपे लढण्यास तयार दिसत नाहीत. त्या पक्षाकडेही दुसरा उमेदवार नाही. त्यामुळे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष असलेले राजू पाटील यांना आघाडीच्या पाठिंब्याचे उमेदवार म्हणून पुढे केले जाऊ शकते.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र मते, त्याला मनसेची जोड आणि भाजपा, शिवसेनेतील नाराजांची मोट बांधत शिवसेनेविरूद्ध लढण्याच्या हालचाली सुरू आहेत. शिवसेनेत डावलले जाणारे ‘आगरी कार्ड’ खेळवण्याचे विरोधकांचे प्रयत्न आहेत. येथील कल्याण पूर्व भागात दीर्घकाळानंतरही नागरी सुविधा मिळत नसल्याने शिवसेनेविषयी नाराजी आहे. २७ गावे वगळण्यावरील शिवसेनेच्या भूमिकेमुळे नाराजीचा फटका कल्याण ग्रामीणमध्ये बसण्याची भीती आहे. डोंबिवलीत संघाची नाराजी हा कळीचा मुद्दा आहे.मुंब्रा-कळव्यात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेने ठाणे महापालिकेत जुळवून घेतले. काही आंदोलने मिळून केली. पण तेथे राष्ट्रवादीतील नेतेच परस्परांना आव्हान देऊ लागल्याने व नवे मुस्लीम नेतृत्व उभे राहत असल्याने तेथेही शिवसेनेला पूर्वीसारखी एकहाती मदत न मिळता बरेच प्रयत्न करावे लागतील. उल्हासनगरमध्ये शिवसेनेला साथ न देणाऱ्या सिंधी मतदारांत भाजपाने चांगलेच पाय रोवले आहेत.या साºयाचा विचार करूनच गेली दोन वर्षे मंत्री एकनाथ शिंदे यांनी मुलासाठी सातत्याने फिल्डिंग लावली. पक्षातील वेगवेगळे गट सांभाळून घेतले. भाजपाशीही जुळवून घेतले. मुख्यमंत्र्यांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा वापर करत अनेक प्रकल्पांच्या घोषणा केल्या. त्याचा व आजवर केलेल्या कामाचा श्रीकांत शिंदे यांना फायदा होईल, हे नक्की. आता राज ठाकरे यांच्याशी संबंधांचा वापर करीत मनसेच्या लढतीचीतीव्रता कमी करण्यात शिंदे यांना यश आले, तर मात्र वेगळे चित्र दिसूशकते.सध्याची परिस्थितीअंबरनाथमध्ये शिवसेनेतील वेगवेगळे गट अस्वस्थ आहेत. रक्तरंजित संघर्ष आणि व्हिडिओ क्लिपने त्याचे प्रत्यंतर दिले आहे. तशीच खदखद कल्याण ग्रामीण मतदारसंघात आहे.डोंबिवलीत भाजपाच्या नाराजांनी हात आखडता घेतला आणि ब्राह्मण- दाक्षिणात्य, बंगाली मतदारांनी वेगळी भूमिका घेतली, तर तेही उमेदवारांसमोर आव्हान असेल.मराठा समाजाला कुणबी ठरवून आरक्षण दिल्याने मराठा आणि मराठेतर नेते-कार्यकर्ते यांच्यातील सुप्त संघर्ष या निवडणुकीत थेट पाहायला मिळण्याची शक्यता आहे.आघाडीत प्रकाश आंबेडकरांचा समावेश झाल्यास मागास-मुस्लिमांच्या मतांवर परिणाम होईल. कल्याणमधील आंबेडकर-ओवेसींच्या सभेने त्याची चुणूक दाखवली आहे.

टॅग्स :kalyanकल्याणElectionनिवडणूक