शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

कफनीधारी योगींचा भाजपत वाढता बोलबाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 4:17 AM

परदेशस्थ भारतीयांबाबतच्या पुढच्या खेळीकडे लक्ष

- हरिष गुप्ताउत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यापासून भाजपमध्ये त्यांचा आलेख सतत चढता राहिला आहे. दिल्लीतील राजकारणाच्या धुमाळीपासून दूर राहून योगी आदित्यनाथ आपली नवी प्रतिमा घडविण्याचा लखनऊमध्ये नेटाने प्रयत्न करत आहेत. भगवी कफनी धारण करणारे योगी असले तरी आदित्यनाथ यांची हिंदुत्ववादी विचारसरणी एक कणखर प्रशासक म्हणून त्यांच्या आड आलेली नाही.नेटाने व युक्तीने कामे करून घेणारा मुख्यमंत्री म्हणून त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. त्यांची कामाची पद्धत नेहमीच्या राजकारण्यांना कदाचित पसंत नाही व काही त्यांना मुस्लिमविरोधीही म्हणतात. काहीजण तर त्यांच्यावर जातीयवादी असल्याचाही आरोप करतात. पण त्यांनी भाजपमध्ये स्वत:चे असे वेगळे स्थान नक्कीच निर्माण केले आहे. पक्षात अनेक जुने व अनुभवी मुख्यमंत्री असूनही योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्यात स्थान मिळविले आहे.नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्यानंतर योगी भाजपमधील तिसरे आधारस्तंभ मानले जातात, असे पक्षातील जाणकार सांगतात. नाही म्हणायला राजनाथ सिंग यांचे पक्ष व सरकारमध्ये अधिकृतपणे दुसऱ्या क्रमांकाचे स्थान आहे. पण या प्रेमळ ठाकूर नेत्याचे ते स्थान केवळ त्यांच्या टिकून राहण्याच्या कलेमुळे आहे. उलट पक्षातील कट्टर हिंदुत्ववाद्यांना आदित्यनाथ अधिक जवळचे वाटतात. चार वेळा लोकसभेत निवडून येऊनही दिल्लीच्या राजकारणात योगी घट्ट पाय रोवू शकले नव्हते. पण उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री झाल्यावर त्यांचे जे रूप दिसले त्याने त्यांचे विरोधकही थक्क झाले. दिल्लीत पाय ओढायला अनेकजण असूनही त्यांनी घट्ट पाय रोवले आहेत. येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये योगी अमेरिकेला जाण्याचा विचार करत आहेत, अशाही बातम्या आहेत. पूर्वी मोदींनी परदेशांमधील भारतीयांपैकी ज्या वर्गाची मने जिंकली त्यांच्याकडेच आदित्यनाथ यांचाही रोख आहे. अमेरिकेत जायचेच असेल तर तेथील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक उरकल्यावर जानेवारीत जावे, असा सल्ला काहींनी त्यांना दिल्याचे कळते. योगींची पुढची खेळी लक्ष ठेवण्यासारखी असेल हे नक्की.जयशंकर व आत्मनिर्भर भारतपंतप्रधान मोदी यांची अत्यंत विश्वासू व महत्वाची टीम कोणालाही फारसे न दिसता गुपचूप काम करत असते. मोदींचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल किंवा अगदी मोदींनी परराष्ट्रमंत्री म्हणून खास निवडलेले एस. जयशंकर या सर्वांच्या कामाची पद्धत तशीच आहे. पूर्वीचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन सतत प्रसिद्धीच्या झोतात असायचे. पण दोभाल मात्र टीव्हीच्या पडद्यावर अभावानेच दिसतात.सुषमा स्वराज यांच्या तुलनेत परराष्ट्रमंत्री म्हणून जयशंकरही क्वचितच चर्चेत असतात. याचा अर्थ जयशंकर एकलकोंडे आहेत, असा मात्र बिलकूल नाही. त्यांना आपल्या बॉसचा स्वभाव चांगला माहित असल्याने तेही बॉससाररखेच मोठे कामही गुपचूप करत असतात. अलिकडेच त्यांनी ब्ल्यूजीन्सच्या वतीने एक वेबिनार आयोजित केला. ब्ल्यूजीनचे नावही फारशा लोकांनी ऐकले नसेल. पण जगभरातील मान्यवर आणि प्रभावशाली अशा ४० लोकांचा हा गट आहे.या वेबिनारमध्ये जयशंकर यांनी मोदींची ‘आत्मनिर्भर भारता’ची कल्पना अत्यंत सोप्या पद्धतीने स्पष्ट केली. ते म्हणाले, भारताने १९९० च्या दशकात विदेशी गुंतवणूकदार व कंपन्यांना दरवाजे खुले केले, तेव्हा त्यातून देशातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मार खातील याची कल्पना नव्हती. जयशंकर यांनी जगभरातील या प्रभावशाली व्यक्तींना सांगितले की, व्यवस्थेत निर्माण झालेला हा दोष आम्ही आता दूर करत आहोत व हे एका दमात करणे शक्य नाही. शेवटी परराष्ट्र मंत्रालयाचे ९० टक्के काम व्यापाराशी तर संबंधित असते.न्या. अरुण मिश्रांसाठी सोयकंपन्यांची दिवाळखोरी आणि बँकांच्या बुडित कर्जांची वसुली या बाबतीत अत्यंत महत्वाची भूमिका बजावणाºया राष्ट्रीय कंपनी कायदा अपिली न्यायाधिकरणाच्या (एनसीएलएटी) नव्या अध्यक्षांची नियुक्ती सरकारने एव्हाना करणे अपेक्षित होते.प्रभावी महिला नेत्याचा शोध : निर्णय घेणाच्या बाबतीत सर्वोच्च व शक्तिशाली अशा भाजप संसदीय मंडळावर सदस्य म्हणून नेमणुकीसाठी पक्ष सध्या प्रभावी महिला नेत्याच्या शोधात आहे. सुषमा स्वराज यांच्या निधनाने मंडळातील महिलांची जागा रिकामी आहे. निर्मला सीतारामन व स्मृती इराणी या दोन केंद्रीय मंत्री व भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या स्पर्धेत असल्याचे सांगितले जाते. पण प्रेमळ स्वभावाच्या व शांतपणे काम करणाºया पक्षाच्या सरचिटणीस सरोज पांडे याच कदाचित बाजी मारतील, असे पक्षातील माहितगारांना वाटते.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपा