शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भिक लागली काय, मी तुला फुक्कट पोसणार काय ? शशांकने मागितले होते 2 कोटी 
2
सैफुल्लाहच्या शोकसभेत भारताविरोधात ओकली गरळ; पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा पुन्हा उघड
3
Corona Virus : धोक्याची घंटा! कोरोना पाठ सोडेना, रुग्णसंख्येत होतेय दिवसागणिक वाढ; तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला
4
'वक्फ इस्लामचे अविभाज्य अंग नाही, ते धर्मादाय संस्थेसारखे', सुप्रीम कोर्टात केंद्राने मांडली बाजू
5
"अजितदादा, तुम्ही पदाधिकाऱ्याला वाचवणार की वैष्णवीला न्याय देणार?", सुषमा अंधारे संतापल्या
6
“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल
7
वैष्णवी हगवणे यांच्या शवविच्छेदन अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती, आहे असा उल्लेख
8
कुली बनला IAS...! स्टेशनच्या फ्री वाय-फायचा वापर करत पास केली सर्वात कठीण UPSC परीक्षा
9
Corona Virus : कोरोनाचा भयावह वेग! ब्रिटनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या एका आठवड्यात झाली दुप्पट
10
तीन दिवसांच्या घसरणीला 'ब्रेक'! सेन्सेक्स-निफ्टी उसळले, 'या' शेअर्सनी दिला बंपर फायदा!
11
IPL 2025: वैभव सूर्यवंशी अन् त्याला आलेले ५०० 'मिस्ड कॉल'; राहुल द्रविडसमोर झाली 'पोलखोल'
12
Luck Sign: देवपूजा करताना 'या' गोष्टींचे घडणे, म्हणजे साक्षात ईश्वरीकृपेचे शुभसंकेत!
13
Nala Sopara: नालासोपाऱ्यात अडीच कोटींचे अंमली पदार्थ जप्त, नायजेरियन आरोपीला अटक
14
CPEC चा विस्तार अफगाणिस्तानपर्यंत होणार, पाकिस्तानच्या सहकार्याने चीनचा नवी खेळी
15
धक्कादायक! चक्क ग्रामपंचायत कार्यालयच २० लाख रुपयांना ठेवलं गहाण, सरपंच बरखास्त, एफआयआर दाखल 
16
अमेरिकेला 'धक्का' देणारी मूडीज भारतावर 'फिदा'! अर्थव्यवस्था मजबूत, पाकिस्तानला मात्र 'झटका'
17
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
18
“शिष्टमंडळ पाठवून काही फायदा नाही, चीन, श्रीलंका, तुर्कस्थानात कुणाला पाठवले का?”: संजय राऊत
19
'कपिल शर्मा शो'मधील सर्वांच्या लाडक्या व्यक्तीचं झालं निधन, कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
20
चेक बाउन्स झाला तर आता काही खरं नाही! सरकारचे नवे नियम, दुप्पट दंड ते तुरुंगापर्यंतची शिक्षा!

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योतीने पाकिस्तानला पुरवली 'ही' माहिती; दानिशसोबत होती संपर्कात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2025 11:45 IST

ऑपरेशन सिंदूर दरम्यान ज्योती एका पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या संपर्कात होती आणि भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होती.

देशविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या गंभीर आरोपांमुळे चर्चेत असलेली हरियाणाची युट्यूबर ज्योती मल्होत्रा सध्या पोलीस कोठडीत असून, तिच्या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर दरम्यान ती एका पाकिस्तानी आयएसआय एजंटच्या संपर्कात होती आणि भारतातील संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होती.

ऑपरेशन सिंदूर दरम्यान महत्त्वाची माहिती पाकिस्तानला लीक?मिडिया रिपोर्टनुसार, ज्योतीने ऑपरेशन सिंदूरसंबंधित माहिती, ब्लॅकआउट्स आणि इतर सुरक्षा हालचालींसंबंधी डेटा पाकिस्तानला पाठवल्याचे समोर आले आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरून ती गुप्त माहिती संकलित करून, सीमेपलीकडे पाठवत असल्याचे संकेत पोलीस तपासातून समोर आले आहेत.

फॉरेन्सिक तपास सुरूपोलिसांनी ज्योतीकडून तीन मोबाईल फोन्स आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे, ज्याचा तपास सध्या फॉरेन्सिक विभागाकडे सुरू आहे. याशिवाय, तिच्या दोन बँक खात्यांची माहितीही गोळा केली जात आहे, ज्यातून आर्थिक देवाणघेवाणी आणि परकीय संपर्क तपासले जात आहेत.

प्राथमिक तपासात हे स्पष्ट झाले आहे की, ज्योती २०२३ पासून २०२५ पर्यंत पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकारी दानिश उर्फ एहसान-उर-रहीमच्या संपर्कात होती. अद्याप दोघांमधील थेट संवादाच्या स्पष्ट नोंदी मिळाल्या नसल्या तरी, ऑपरेशन सिंदूरच्या काळात संपर्क झाल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत.

युट्यूब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा वापरज्योती मल्होत्राच्या युट्यूब चॅनेलला ३.७७ लाख सबस्क्रायबर्स आहेत आणि तिचे इन्स्टावर १.३३ लाख फॉलोअर्स आहेत. तपास यंत्रणांना शंका आहे की, याच सोशल मीडिया प्रभावाचा वापर करून ती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती.

उत्तर भारतात सक्रिय नेटवर्कपीटीआयच्या वृत्तानुसार, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात गेल्या दोन आठवड्यांत सुमारे १२ व्यक्तींना हेरगिरीच्या आरोपांत अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये हरियाणाच्या ज्योती मल्होत्रासह पंजाबच्या गजाला नावाच्या ३१ वर्षीय महिलाचाही समावेश आहे. गजाला ही दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याच्या संपर्कात होती.

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर