न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 06:51 IST2025-08-08T06:50:11+5:302025-08-08T06:51:03+5:30

न्या. यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली...

Justice Verma's conduct is not credible; Supreme Court refuses to quash recommendation for impeachment | न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 

न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 


नवी दिल्ली : न्यायालयीन चौकशीत मला दोषी ठरविण्यात आले असून, तो अहवाल अवैध म्हणून जाहीर करण्यात यावा या मागणीसाठी न्या. यशवंत वर्मा यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. न्या. दीपांकर दत्ता, न्या. ए. जी. मसीह यांच्या खंडपीठाने सांगितले की, न्या. वर्मा यांच्या वर्तनावर विश्वास ठेवणे शक्य नसून, त्यांची याचिका सुनावणीसाठी घेता येणार नाही. 

न्या. वर्मा यांच्यावर महाभियोग सुरू करण्याची तत्कालीन सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी केलेली शिफारस रद्द करावी अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, तत्कालीन सरन्यायाधीश आणि अंतर्गत चौकशी समितीने सर्व नियमांचे पालन करूनच कारवाई केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने न्या. वर्मा यांच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीचा अहवाल पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे पाठवणे हे घटनाबाह्य किंवा बेकायदेशीर नव्हते. न्या. वर्मा यांच्या कोणत्याही मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले नाही. 


 

Web Title: Justice Verma's conduct is not credible; Supreme Court refuses to quash recommendation for impeachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.