शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

न्या. लोया मृत्यूप्रकरणी हायकोर्टातील सर्व खटल्यांची सुनावणी आता सुप्रीम कोर्टात होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 15:07 IST

न्या. लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयानं न्या. लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत.

नवी दिल्ली- न्या. लोया मृत्यूप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं मोठा निर्णय दिला आहे.  न्या. लोया मृत्यू प्रकरणाशी संबंधित असलेली दोन प्रकरणं मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग करण्यात आली आहेत. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात न्या. लोया यांच्या मृत्यूप्रकरणी सुनावणीला सुरुवात होणार आहे. न्या. लोया यांच्या मृत्यूसंबंधीच्या सर्व दस्तावेजांची चौकशी होणार आहे. या निर्णयानंतर आता न्या. लोया मृत्यू प्रकरणातील दोन याचिका या मुंबई उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात वर्ग होणार आहेत. या प्रकरणावर फडणवीस सरकारनंही स्पष्टीकरण दिलं आहे. न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाला आहे. यात कोणत्याही प्रकारचा कट नाही. न्या. लोया प्रकरणाशी संबंधित सर्व सुनावण्या आता सर्वोच्च न्यायालयात होणार आहेत. न्या. लोया यांचा मृत्यू हृदयविकारानेच!न्या. लोया यांच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू असताना, त्यांचा मृत्यू हृदयविकारानेच झाल्याचा खुलासा नागपूर पोलीस सहआयुक्त शिवाजी बोडखे यांनी नुकताच केला आहे. नागपूर पोलिसांनी न्या. लोया यांच्या मृत्यूची चौकशी केली असून, शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. हे स्पष्ट झाल्यानंतरच या प्रकरणाची फाईल बंद करण्यात आली, असं त्यांनी स्पष्ट केलं. 

'आम्हाला कुणावरही संशय नाही!'न्यायमूर्तींच्या बंडानंतर विरोधकांनी न्या. लोया यांच्या मृत्यूच्या चौकशीची मागणी उचलून धरली आहे. मात्र त्याचवेळी, न्या. लोया यांचा मुलगा अनुजने पत्रकार परिषद घेऊन, आम्हाला कुणावरही संशय नसल्याचं स्पष्ट केलंय. कुठल्याही संशयास्पद परिस्थितीत माझ्या वडिलांचा मृत्यू झालेला नाही आणि आम्हाला कोणत्याही चौकशीची गरज वाटत नाही, असं त्यानं म्हटलं होतं. 

टॅग्स :CBI judge B.H Loya death caseन्या. लोया मृत्यू प्रकरणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय