शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

जरा याद करो कुर्बानी... PM मोदींकडून पुलवामातील शहीदांना श्रद्धांजली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 9:50 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन भारतमातेच्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.  

नवी दिल्ली - देशभरातील अनेक ठिकाणी १४ फेब्रुवारी हा व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जात होता. मात्र, दुसरीकडे काश्मीरच्या सीमारेषेवर दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्याचे ४० जवान शहीद झाले. देशसेवेचं कर्तव्य बजावताना सैन्याच्या जवानांना वीरमरण प्राप्त झालं. १४ फेब्रुवारी २०१९ रोजी हा भ्याड हल्ला देशावर झाला, त्यामुळे देश गहीवरला. आज त्या हल्ल्याला ५ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही त्या घटनेच्या आठवणी ताज्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करुन भारतमातेच्या शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.  

दिवंगत गाणसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी गायलेलं जो शहीद हुए है उनकी, जरा याद करो कुर्बाणी.. हे  गाणं देशसेवसाठी बलिदान देणाऱ्या जवानांची आठवण करुन देते. पुलवामा हल्ल्यात वीरमरण पत्करलेल्या जवानांच्या बलिदानाची आठवण काढत सोशल मीडियातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज युएई दौऱ्यावर असून तेथील हिंदू मंदिराचे उद्घाटन त्यांच्याहस्ते होत आहे. दरम्यान, त्यांनी ट्विट करुन पुलवामा हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे.  

"पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या शूर वीरांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांची सेवा आणि आपल्या देशासाठीचं त्यांचं बलिदान नेहमीच स्मरणात राहील.", असे ट्विट मोदींनी केले आहे. मोदींसह इतरही अनेक मंत्र्यांनी ट्विट करुन पुलवामा हल्ल्यातील शहीदांना आदरांजली वाहिली. तर, सोशल मीडियातूनही त्या काळ्या दिवसाच्या आठवणी जागवत शहीदांचे स्मरण केले जात आहे. 

काश्मीर खोऱ्यातील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला होता. त्यावेळी बसमधून प्रवास करत असलेले ४० CRPF जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या भ्याड हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइकही केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या धाडसी निर्णयाचं भारतीय नागरिकांकडून मोठं समर्थनही करण्यात आलं. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी दुपारी ३०० किलो स्फोटकांनी भरलेल्या वाहनाने सीआरपीएफच्या वाहनाला धडक दिली आणि लष्करी ताफा उडवला. त्यामध्ये भारताचे ४० जवान शहीद झाले. म्हणूनच, पुलवामा हल्ला भारतातील मोठ्या दहशतवादी हल्ल्यांपैकी एक मानला जातो. मात्र, या हल्ल्यानंतर भारताने बालाकोट येथे सर्जिकल स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तसेच, पाकिस्तानलाही जशास तसे प्रत्युत्तर दिले होते. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवाद