अयोध्या - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहे. कोरोनाचा फटका हा अनेक क्षेत्रांना बसला आहे. काही शहरांतील जागांचे भाव हे अचानक कमी झाले आहेत. संपूर्ण देशात बऱ्यापैकी असंच चित्र पाहायला मिळत आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या अयोध्येमध्ये एका महिन्यात जागांचे भाव दुप्पट झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिरावर निर्णय दिल्यानंतर अयोध्येतील जागांचे भाव वाढायला सुरुवात झाली. ऑगस्टमध्ये राम मंदिर भूमिपूजनानंतर भाव आता दुप्पट झाल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर अयोध्येतील जागांचे भाव हे 30 ते 40 टक्क्यांनी वाढल्याचं समोर आलं होतं. प्रॉपर्टी कंसल्टेंट ऋषी टंडन यांनी दिलेल्या माहितीनुसार, अयोध्येतील जागांचे भाव 1000 ते 1500 रुपये प्रति चौरस फूट झाले आहेत. तर मुख्य भागांच्या ठिकाणी जागांचे भाव 2000 ते 3000 वर गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी अयोध्येत्येतील मुख्य भाग आणि आजूबाजूच्या भागांमध्ये जागांचे भाव 900 रुपये प्रतिचौरस फूट होते.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर जमिनीचे भाव वेगाने वाढले

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येत आंतरराष्ट्रीय विमानतळ, थ्री स्टार्स हॉटेल्स आणि इतर काही प्रोजेक्ट उभारणार असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर जमिनीचे भाव वेगाने वाढले आहेत. तसेच जमिनीची खरेदी करणाऱ्यांची देखील संख्या वाढली आहे. अयोध्येपासून सर्वात जवळचे हॉटेल हे 6 किलोमीटर अंतरावर आहे. अयोध्येच्या बाहेरील परिसरात सुविधांचा मोठा अभाव आहे. त्यामुळे या भागात 300 ते 450 प्रतिचौरस फूट असे जागांचे भाव होते.

काही जण भविष्याच्या दृष्टीने मोठी गुंतवूणक करण्याच्या विचारात

सरकारकडून अयोध्येच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादन करण्यात येण्याच्या शक्यता आहे. यामुळे जागांचे भाव वाढले आहेत. अयोध्येत काही जागांचे वाद आहेत.  विक्रीला असलेल्या बहुतेक जागा या शरयू नदीच्या किनारी आहेत. पण या परिसराकडे राष्ट्रीय हरित लवादाची नजर आहे. बहुतेक विक्रेत्यांना धार्मिक कारणासाठी जागा विकत घ्यायच्या आहेत. धर्मशाला उभारण्यासाठी, अन्नछत्रासाठी आणि तर काही जण भविष्याच्या दृष्टीने मोठी गुंतवूणक करण्याच्या विचारात आहेत अशी माहिती प्रॉपर्टी एजेंट सौरभ सिंह यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

अलर्ट! ना इंटरनेट बँकिंग, ना पेटीम अकाऊंट तरीही खात्यातून पैसे गायब, वेळीच व्हा सावध

"देश सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्यांना भाजपसमर्थक मोदीभक्त 'नटी'ने आतंकवादी ठरविले"

"लोकशाही देशाला गप्प बसवणं सुरूच, आधी आवाज दाबला आणि आता...", राहुल गांधी संतापले

मस्तच! WhatsApp मध्ये लवकरच 'हे' बहुप्रतिक्षित फीचर येणार, एकच अकाऊंट अनेक ठिकाणी चालणार

कोरोनावर मात केल्यावर भाजपा आमदाराला 'अत्यानंद', मास्क न लावता मंदिरात केला डान्स

CoronaVirus News : मोठा दिलासा! कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात भारी, 'ही' आकडेवारी सुखावणारी

English summary :
just in one month property rates in ayodhya increased in double

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: just in one month property rates in ayodhya increased in double

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.