नवी दिल्ली : खरा भारतीय कोण हे ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत असे काँग्रेसच्या सरचिटणीस खा. प्रियांका गांधी यांनी मंगळवारी म्हटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारत व चीनसंदर्भात केलेल्या विधानांसंदर्भात त्यांना सर्वोच्च न्यायालयाने सुनावले होते. त्यावर त्या म्हणाल्या की, राहुल गांधी यांना भारतीय सैन्याबद्दल अतिशय आदर आहे. सैन्याविषयी त्यांनी कधीही टीका करणारी वक्तव्ये केलेली नाहीत.
राहुल यांनी सैन्याबाबत केलेल्या वक्तव्यांबद्दल लखनाै न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली.
राहुल विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी पार पाडताहेत...सर्वोच्च न्यायालयाचा मान राखून म्हणावेसे वाटते की, सच्चा भारतीय कोण हे ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत. राहुल यांच्या विधानांचा विपर्यास करण्यात आला. विरोधी पक्षनेत्याची सरकारला प्रश्न विचारणे ही जबाबदारी आहे व ती ते उत्तमपणं पार पाडत आहेत.